काबूलमध्ये गुरुवारी रात्री पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात नुकसान झालेल्या एका घराबाहेर बसलेले जखमी अफगाण नागरिक. 
आंतरराष्ट्रीय

Pakistan airstrikes Taliban | पाकिस्तानचे हवाई हल्ले; 6 तालिबानी ठार

अफगाणिस्तानचे चोख प्रत्युत्तर

पुढारी वृत्तसेवा

काबूल; वृत्तसंस्था : अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, अफगाण हवाई दलाने शुक्रवारी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये हवाई हल्ला केला. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही कारवाई पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून करण्यात आली.

संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडियावर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोहाट प्रदेशातील पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले. त्याचबरोबर लष्करी किल्ल्यालाही लक्ष्य करण्यात आले. मात्र, या हल्ल्यात कोणी ठार झाले किंवा जखमी झाले याची अधिकृत पृष्टी करण्यात आलेली नाही. पाकिस्तानने गुरुवारी रात्री अफगाणिस्तानची राजधानी काबूल आणि कंदाहारमध्ये हवाई हल्ले केले होते. तालिबान अधिकार्‍यांच्या मते, या हल्ल्यात 6 लोकांचा मृत्यू झाला असून, 15 जण जखमी झाले आहेत. यात महिला आणि मुलांचा समावेश आहे. त्याचबरोबर अनेक घरांचेही नुकसान झाले आहे.

पाकने अफगाणच्या इंधन डेपोवर हल्ला केला होता

तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांच्या मते, पाकिस्तानने काम एअर या खासगी एअरलाईनच्या इंधन डेपोवर हल्ला केला होता, जो नागरी विमाने आणि संयुक्त राष्ट्रांच्या विमानांनाही इंधन पुरवतो. त्यांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला. तर, पाकिस्तानी सुरक्षा अधिकार्‍यांनी ‘रॉयटर्स’ला सांगितले की, ही कारवाई पाकिस्तानी तालिबानच्या ठिकाणांवर करण्यात आली आहे. अलीकडच्या काही महिन्यांत देशात वाढलेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर हे ऑपरेशन सुरू करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT