आंतरराष्ट्रीय

Pak Anchor Rabia Ahsan | पाकिस्तानी टीव्ही अँकर राबिया अहसान यांची गोळी झाडून हत्या

पतीला पोलिसांनी घेतले ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

रावळपिंडी; वृत्तसंस्था : पाकिस्तानमधील प्रसिद्ध टीव्ही अँकर राबिया अहसान (वय ४१) यांचा रविवारी रावळपिंडी येथील राहत्या घरी गोळी लागून मृत्यू झाला. त्यांच्या गळ्याखाली गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी राबिया यांच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांनी पिस्तूल हाताळताना अचानक गोळी सुटल्याचा दावा केला आहे. मात्र, मृत अँकरच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी पिस्तूल जप्त केले आहे. तसेच घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचीही चौकशी केली. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. राबिया या गुलशनाबाद परिसरात राहत होत्या. त्या एका खासगी वृत्तवाहिनीवर अँकर आणि सूत्रसंचालक म्हणून कार्यरत होत्या. घटनेवेळी राबिया यांच्या १३ आणि ११ वर्षांच्या दोन्ही मुली घराच्या आवारातील लॉनमध्ये आजीसोबत होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT