shahid khattak - shehbaz sharif Pudhari
आंतरराष्ट्रीय

Operation Sindoor India-Pakistan Conflict: पंतप्रधान शरीफ बुझदिल! मोदींचे नाव घ्यायला घाबरतात; पाकिस्तानच्या खासदाराने सुनावले

Operation Sindoor India-Pakistan Conflict: इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाचा खासदार आक्रमक

पुढारी वृत्तसेवा

Pakistan MP Shahid Khattak on Operation Sindoor and India-Pakistan Conflict

इस्लामाबाद : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरतेचा सूर अधिकच चढला आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या संसदेत शुक्रवारी (9 मे 2025) गदारोळ पाहायला मिळाला.

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इंसाफ (PTI) पक्षाचे खासदार शाहिद खटक यांनी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शरीफ हे बुझदिल (भित्रे) आहेत. मोदींचे नाव घेण्याची त्यांच्यात हिंमत नाही... असे खासदार शाहिद खटक म्हणाले.

जेव्हा नेता बुजदिल असतो, तेव्हा शूर लष्करही हरतं

खासदार शाहिद खटक यांनी भाषणादरम्यान थेट टीपू सुलतान यांचा दाखला देत म्हटलं की, "जर लष्कराचा सरदार सिंहासारखा शूर असेल, तर कोल्ह्यासारखे सैनिकही सिंहांसारखे लढतात. पण जर नेता कोल्ह्यासारखा बुझदिल असेल, तर सिंहासारखे सैनिकही पराभूत होतात."

शहबाज शरीफ गिधाड आहेत – शाहिद खटक

खा. खटक यांनी पंतप्रधान शहबाज शरीफ यांना ‘बुझदिल’ आणि ‘गीदड़’ (कोल्हा) असे संबोधत प्रश्न केला की, "असा नेता जो भित्रा आहे आणि पाकिस्तानचं नाव घेण्याचं धाडसही करत नाही, तो सीमारेषेवर सैनिकांना लढण्याचा संदेश काय देणार? पाकिस्तानच्या टॉप लीडरशिपमध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी भीती आहे. मोदींचं नाव घ्यायलाही ही मंडळी घाबरतात," असा आरोप त्यांनी केला.

भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानमध्ये खळबळ

भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानने भारतीय सैनिकी ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सैन्याच्या सजगतेमुळे ही योजना फसली. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला असून एलओसी (LOC) परिसरात सलग दोन दिवस ड्रोन हल्ले व स्फोट झाले आहेत.

भारतानं पाकिस्तानमधील लाहोर, इस्लामाबाद, कराचीसारख्या शहरांना टारगेट केले आहे. सीमेलगतच्या सर्व भारतीय शहरांना अलर्टवर ठेवण्यात आलं आहे.

पाकिस्तानमध्ये सरकारविरोधात रोष

पाक संसदेत सलग दुसऱ्या दिवशी सरकारविरोधात टीकेचा भडिमार झाला.

देशाच्या संरक्षण धोरणावर, लष्कराच्या तयारीवर आणि पंतप्रधानांच्या निर्णयक्षमतेवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. पाकिस्तान तेहरिक ए इन्साफसह इतर विरोधी पक्षही सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत.

पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला भारताच्या तडाखेबंद प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानमध्ये राजकीय गोंधळ आणि लष्करी तयारीवर संशय व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT