पुढारी ऑनलाईन डेस्क : Blood moon 2025| प्रत्येक दिवशी पृथ्वीसह अनेक ग्रहांवर खगोलीय घटना घडत असतात. आज शुक्रवारी (दि.१४) ब्रिटन, अमेरिका आणि अटलांटिक महासागर परिसरातील अनेकांना "ब्लड मून"चे दर्शन झाल्यानंतर एकच प्रश्न विचारला जात आहे की, पुढील पूर्ण चंद्रग्रहण कधी आहे? पुढच्या वेळी "ब्लड मून" कधी दिसेल. याबद्दल खगोल प्रेमींना माहिती असणे आवश्यक आहे.
या वर्षी म्हणजे २०२५ मधील पुढील 'पूर्ण चंद्रग्रहण' ७-८ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही खगोलीय घटना पूर्णपणे प्रामुख्याने आशिया, ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिकच्या काही भागातून दिसेल. या वर्षात होणारे दुसरे चंद्रग्रहण भारतातील लोकांनादेखील दिसण्याची शक्यता आहे. जेव्हा चंद्राचा पृष्ठभाग पूर्णपणे लाल होईल ही घटना ८२ मिनिटे दिसेल, असे 'फोर्ब्स'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
चंद्रग्रहण ही एक वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. चंद्रग्रहण साधारणपणे पौर्णिमेच्या दिवशी होते, जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत असतात. पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये आल्यामुळे, पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, ज्यामुळे चंद्रग्रहण दिसू लागते. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सावलीत पूर्णपणे येतो, तेव्हा चंद्र लालसर दिसतो.