पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर कोरियाने सोमवारी (दि.10) अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र समुद्रात डागल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या लष्कराने दिली. याआधीच दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांनी संयुक्त लष्करी सरावाला सुरुवात केली होती, ज्याला उत्तर कोरिया संभाव्य आक्रमणाची तयारी मानतो. या क्षेपणास्त्र चाचण्या उत्तर कोरियाच्या यंदाच्या पाचव्या चाचण्या असल्याचे दक्षिण कोरियाच्या लष्कराने स्पष्ट केले. हा लष्करी सराव ११ दिवस चालणार असून, याच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने अमेरिकेवर आणि दक्षिण कोरियावर गंभीर आरोप केले आहेत. दक्षिण कोरियाने या सरावाला "धोकादायक भडकवणारी कृती" म्हणून संबोधले आहे आणि यामुळे कोरियन द्वीपकल्पात संघर्षाचा धोका वाढत असल्याचा इशारा दिला आहे. अशा माहितीचे वृत्त 'एपी' या वृत्तसंस्थेने दिले आहे.