सेऊल (दक्षिण कोरिया) : पुढारी ऑनलाईन
उत्तर कोरियाचे निर्दयी हुकूमशहा किम जोंग ऊन यांच्या ठावठिकाणावरून जगभरासह सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा होत आहे. जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असतानाच गेल्या दोन दिवसांपासून किंग जोंग ऊन गेले कुणीकडे? एवढी एकच चर्चा सुरु सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हुकूमशहा किम जोंग उन यांच्या तब्येतीबाबत रहस्य कायम आहे. परंतु, यादरम्यान काही माध्यमांमध्ये असे म्हटले आहे की त्यांचा मृत्यू झाला आहे, तर काही अहवालांमध्ये आजारातून फिट होऊन ते फिरत असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर कोरियाकडून आतापर्यंत कोणतेही स्पष्ट विधान समोर आलेले नाही.
अधिक वाचा : उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग ऊन यांचे निधन?
तथापि दक्षिण कोरियाने त्यांच्या तब्येतीवरून मोठा खुलासा केला आहे. किम जोंग ऊन जिवंत आणि सुरक्षित असल्याचा दावा दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जेन इन यांचे वरिष्ठ सुरक्षा सल्लागारांनी केला आहे. वरिष्ठ सुरक्षा सल्लागार मून चूंग इन यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ते सुरक्षित आणि जिवंत असल्याची आमच्या सरकारची भूमिका निश्चित आहे.
त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, किम जोंग ऊन देशाच्या पुर्वोत्तर भागातील वोनसन येथील रिसॉर्ट टाऊन मध्ये राहिले आहेत. गेल्या १३ एप्रिलपासून ते त्या ठिकाणी आहेत. कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळून आल्या नसल्याचेही त्यांनी सांगितले.
अधिक वाचा : चीनच्या 'या' दोन शहरामध्ये पुन्हा वाढतोय कोरोना
दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपती कार्यालयाकडूनही अशाच पद्धतीने खुलासा करण्यात आला होता. आमच्याकडे दुजोरा देण्यासाठी काहीच नाही. तसेच कोणत्याही विशेष हाचचाली उत्तर कोरियामधून आढळून आलेल्या नाहीत, असे त्यांनी म्हटले होते. दरम्यान, अनधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार किम जोंग यांना प्रचंड धुम्रपानाची सवय आहे. तसेच स्थुलपणा आणि थकव्यामुळे तातडीने उपचाराची गरज आहे.
अधिक वाचा : इम्रान खान यांच्या सत्तेला लष्कराकडून हादरे