साहित्‍यातील नोबेल द. कोरियाच्‍या लेखिका हान कांग यांना जाहीर झाला आहे.  Pudhari Photo
आंतरराष्ट्रीय

Nobel Prize in Literature 2024 : साहित्‍यातील नोबेल द. कोरियाच्‍या लेखिका हान कांग यांना जाहीर

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नोबेल पुरस्कार समितीने आज (दि.10) साहित्य क्षेत्रातील सन्मानाची घोषणा केली. यंदाचा साहित्‍यातील नोबेल पुरस्‍कार दक्षिण कोरियाच्या साहित्यिक लेखिका 'हान कांग' यांना यांना जाहीर झाला आहे. या पुरस्‍काराची घोषणा रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने केली. हान कांग नोबेल पुरस्कार मिळवणार्‍या दक्षिण कोरीयाच्‍या पहिल्‍या तर साहित्यातील नोबेल पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या १७ व्या महिला लेखिका ठरल्‍या आहेत. (Nobel Prize in Literature 2024)

हान कांग यांच्या 'ग्रीक लेसन' या कादंबरीवर विशेष चर्चा

१९९३ मध्ये हॅन कांग यांनी कवितांच्या माध्यमातून लिखानाला सुरूवात केली. १९९५ मध्ये 'लव्हस् ऑफ यओसू' हा लघुकथासंग्रह प्रसिद्ध झाला हाेता. जीवनातील मार्मिक कथा सुंदर शैलीत मांडण्यार्‍या हान कांग यांच्‍या 'ग्रीक लेसन' या कादंबरीवर नोबेल समितीने विशेष चर्चा केली आहे. ही कथा आयुष्यातील संकटांमुळे आवाज गमावलेल्या मुलीची आहे. तिला एक ग्रीक शिक्षक भेटताे ताे आपली दृष्टी गमावत आहे. या कादंबरीत संवादातील अडथळे असतानाही दोन माणसांमध्ये फुलणाऱ्या नात्याचे सुंदर वर्णन केले आहे.

'द  व्हेजिटेरियन ' कादंबरीसाठी बुकर प्राईस

हान कांग आपल्या लिखानातून मानवाच्या शारीरिकक आणि मानसिक यातनांवर प्रकाशझोत टाकतात. त्यांच्या युरोपा या लघुकथेमध्ये पुरूष निवेदक, स्त्रीचा मुखवटा घालून आपल्या जगण्यातल्या दु:खावर भाष्य करताे. २०१६ मध्ये त्‍यांना 'द  व्हेजिटेरियन ' कादंबरीसाठी बुकर इंटनरनॅशनल प्राईस फॉर फ्रिक्शन पुरस्कार मिळाला. या कादंबरीतही महिलांचे मानसिक आजार आणि कुटुंबांकडून होणारी उपेक्षा यावर त्‍यांनी भाष्य केले आहे. 1980 मध्ये दक्षिण कोरियाच्या सैन्याने शेकडो विद्यार्थी आणि निशस्त्र नागरिक मारले होते. यावर त्‍यांनी 'ह्युमन ऍक्ट्स' या कादंबरीत ग्वांगजू हत्याकांडाच्या ऐतिहासिक घटनेची कथा मांडली आहे.

२०२३ चा साहित्याचा नोबेल जॉन फॉसे यांना झाला होता जाहीर

गेल्यावर्षीचे साहित्यातील नोबेल पुरस्‍कार नॉर्वेचे साहित्यिक जॉन फॉसे यांना जाहीर झाला होता. अनेक नाविन्यपूर्ण नाटक आणि गद्यासाठी त्‍यांनी दिलेल्‍या याेगदानाबद्‍दल त्यांना साहित्यातील सर्वोच्च पारितोषिक प्रदान करण्‍यात आले होते. नॉर्वेचे रहिवाशी असलेले फॉसे यांनी अनेक नाटक, कादंबरी, कविता संग्रह, निबंध, लहान मुलांची पुस्तके त्यांच्या भाषेत लिहले आहेत. तसेच त्यांनी अनेक पुस्तकांचा अनुवाद देखील केला आहे.

साहित्य क्षेत्रात ११६ नोबेल पारितोषिकांचे वितरण

सन १९०१ ते २०२२ पर्यंत साहित्यातील ११५ नोबेल पारितोषिक, ११९ व्यक्तिंना
रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्यावतीने १९०१ पासून आत्तापर्यंत साहित्य क्षेत्रात ११६ नोबेल पारितोषिक देण्यात आले. सन १९०१ ते २०२२ मध्ये ११९ व्यक्तींना साहित्यातील नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे. यामध्ये १७ महिला, ४१ युवक आणि ८८ वयोवृद्ध साहित्यिकांना साहित्यातील नोबेल देण्यात आले होते. दरम्यान १९१४, १९१८, १९३५, १९४०, १९४१, १९४२, आणि १९४३ या सात वर्षी नोबेल पारितोषिक देण्यात आले नव्हते. नोबेल फाउंडेशनच्या नियमांनुसार, जर कोणताही शोध निर्धारित निकषांमध्ये बसला नाही, तर परितोषिकाची रक्कम पुढील वर्षापर्यंत राखून ठेवली जाते. पहिल्या महायुद्धात आणि दुसऱ्या महायुद्धात कमी नोबेल पारितोषिके देण्यात आली होती.

Nobel Prize in Literature 2024 : यंदाचे जाहीर नोबेल पुरस्‍कार

यंदाच्या वर्षातील वैद्यकशास्त्राच्या (Physiology) नोबेल पुरस्कार ( Nobel Prize) अमेरिकेचे व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन rh'dh मायक्रो आरएनएच्या शोधासाठी जाहीर झाला आहे. फिजिक्स (पदार्थविज्ञान) नोबेल पुरस्कार जॉन जे. हॉपफिल्ड आणि जेफ्री ई. हिंटन यांना ‘कृत्रिम न्यूरल नेटवर्कसह मशीन शिक्षण सक्षम करणाऱ्या पायाभूत शोधांसाठी’ हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. तर रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने २०२४ चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस आणि जॉन एम. जम्पर यांना संयुक्तपणे जाहीर केले आहे. डेव्हिड बेकर यांना 'कॉम्प्युटेशनल प्रोटीन डिझाइन'साठी आणि डेमिस हसाबिस आणि जॉन एम. जम्पर यांना संयुक्तपणे 'प्रोटीन स्ट्रक्चर प्रेडिक्शन" संशोधनासाठी नोबेल पुरस्‍काराने गौरवले आहे. (Nobel Prize 2024)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT