Nobel Prize in Physics : स्वीडिश रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सेसने 2025 चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जॉन क्लार्क, मिशेल एच. डेव्होरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना जाहीर केले आहे. विजेत्यांना ११ दशलक्ष स्वीडिश क्रोनर (≈₹१०.३ कोटी), सुवर्णपदक आणि प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात येईल. पुरस्कार समारंभ १० डिसेंबर रोजी स्टॉकहोममध्ये होणार आहे.
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेव्होरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना विद्युत परिपथातील (electric circuit) 'स्थूल-आकारमानाचे क्वांटम यांत्रिक बोगदा खोदणे' (macroscopic quantum mechanical tunnelling) आणि 'ऊर्जा प्रमाणीकरण' (energy quantisation) या शोधाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
नोबेल पुरस्कार (Nobel Prize) हा जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुरस्कारांपैकी एक आहे. हे पुरस्कार दरवर्षी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्यासाठी दिले जातात. नोबेल पारितोषिकाची स्थापना स्विडिश शास्त्रज्ञ आणि उद्योजक "अल्फ्रेड नोबेल" (Alfred Nobel) यांच्या इच्छापत्रानुसार झाली. 1901: पहिल्यांदा नोबेल पुरस्कार दिले गेले.भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), औषधशास्त्र/चिकित्सा (Physiology or Medicine), साहित्य (Literature) आणि शांती (Peace) पुरस्कार दिले जातात. १९६९ पासून अर्थशास्त्रातील संशोधनासाठीही हा पूरस्कार दिला जातो. पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम (जी प्रत्येक वर्षी वेगळी असते) असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.