नोबेल समितीने आज (दि. ११) २०२४ चा नोबेल शांतता पुरस्कार निहोन हिडांक्यो या जपानी संस्थेला देण्याचा निर्णय घेतला आहे. 
आंतरराष्ट्रीय

जग अण्वस्त्रमुक्त करण्याचा प्रयत्न! जपानच्या निहोन हिडांक्यो संस्थेला नोबेल शांतता पुरस्कार

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : नोबेल समितीने २०२४ चा नोबेल शांतता पुरस्कार (Nobel Peace Prize 2024) निहोन हिडांक्यो (Nihon Hidankyo) या जपानच्या संस्थेला देण्याचा निर्णय घेतला आहे. शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा आज (दि. ११) रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने केली. निहोन हिडांक्यो ही हिरोशिमा (Hiroshima) आणि नागासाकीतील (Nagasaki) अणुबॉम्बमधून वाचलेल्यांची तळागाळातील चळवळ म्हणून ओळखली जाते. या चळवळीला हिबाकुशा म्हणूनही ओळखले जाते. अण्वस्त्रमुक्त जगासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी आणि अण्वस्त्रांचा पुन्हा कधीही वापर होऊ नये हे साक्षीदाराच्या साक्षीतून दाखवून दिल्याबद्दल त्यांना शांतता नोबेल पुरस्कार दिला जात असल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे.

2023 चे शांततेचे नोबेल नर्गेस मोहम्मदी यांना मिळाले होते

गेल्यावर्षी तुरूंगात असलेल्या इराणच्या मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गेस मोहम्मदी यांना शांततेचे नोबेल जाहीर झाले होते. 'इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्धचा लढा, मानवी हक्क आणि स्वातंत्र्याचा प्रचारासाठी' त्यांना 2023 चा शांतता नोबेल पुरस्कार देण्याचा निर्णय रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने घेतला होता.

आतापर्यंत १०४ जणांना शांततेचे नोबेल पारितोषिक

1901 पासून 104 नोबेल शांततेचे पारितोषिक देण्यात आले आहे. ते 19 प्रसंगी प्रदान केले गेले नाहीत, यामध्ये 1914-1916, 1918, 1923, 1924, 1928, 1932, 1939-1943, 1948, 19619-1965, 19675 आणि 1965 साली शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला नाही. पहिल्या आणि दुस-या महायुद्धाच्या काळात कमी नोबेल पारितोषिके देण्यात आली. एकाच व्यक्तीला ७० वेळा, विभागून ३१ जणांना तर ३ वेळा तिघांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. ज्या वर्षी शांतता नोबेल पुरस्कार देण्यात येत नाही, त्यावेळी बक्षीस रक्कम पुढील वर्षापर्यंत राखीव ठेवली जाते. किंवा ही रक्कम फाउंडेशनच्या प्रतिबंधित निधीमध्ये जोडली जाईल, असे नोबेल फाउंडेशनच्या कायद्यात नमूद करण्यात आले आहे.

Nobel Peace Prize 2024: यंदाचे जाहीर नोबेल पुरस्‍कार

यंदाच्या वर्षातील वैद्यकशास्त्राच्या (Physiology) नोबेल पुरस्कार ( Nobel Prize) अमेरिकेचे व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन rh'dh मायक्रो आरएनएच्या शोधासाठी जाहीर झाला आहे. फिजिक्स (पदार्थविज्ञान) नोबेल पुरस्कार जॉन जे. हॉपफिल्ड आणि जेफ्री ई. हिंटन यांना ‘कृत्रिम न्यूरल नेटवर्कसह मशीन शिक्षण सक्षम करणाऱ्या पायाभूत शोधांसाठी’ हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. तर रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने २०२४ चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस आणि जॉन एम. जम्पर यांना संयुक्तपणे जाहीर केले आहे. डेव्हिड बेकर यांना 'कॉम्प्युटेशनल प्रोटीन डिझाइन'साठी आणि डेमिस हसाबिस आणि जॉन एम. जम्पर यांना संयुक्तपणे 'प्रोटीन स्ट्रक्चर प्रेडिक्शन" संशोधनासाठी नोबेल पुरस्‍काराने गौरवले आहे. दक्षिण कोरियाच्या साहित्यिक लेखिका 'हान कांग' यांना साहित्‍यातील नोबेल नुकतेच घोषित करण्यात आला आहे. (Nobel Prize 2024)

नोबेल पुरस्काराचा इतिहास काय आहे?

नोबेल पुरस्कार नोबेल फाऊंडेशनकडून दिला जातो. स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले जातात. अल्फ्रेड नोबेल यांनी मृत्यू आधी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा एका ट्रस्टला दान केला होता. त्यांची इच्छा होती की या पैशांच्या व्याजातून दरवर्षी विविध क्षेत्रात भरीव योगदान देण्याऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जावा. अल्फ्रेड नोबेल यांची संपत्ती स्वीडिश बँकेत जमा आहे. या संपत्तीच्या व्याजातून दरवर्षी नोबेल पुरस्कार दिले जातात. 1901 मध्ये फ्रेडरिक पासी आणि हेन्री ड्युनांट यांना पहिल्यांदा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT