पुढारी ऑनलाईन डेस्क : नायजेरियाच्या ईशान्य भागात दहशतवादी आत्मघातकी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात कमांडरसह किमान २७ नायजेरियन सैनिक ठार झाल्याचे वृत्त 'एएफपी' या वृत्तसंस्थेने दिले आहे.
एका नायजेरियन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सैनिक दहशतवादी कारवाया करण्यासाठी गेले असता त्या वेळी त्या ठिकाणी काळोख होता. सैनिकांना आजूबाजूला काळोख असल्यामुळे स्पष्ट दिसत नव्हते. त्याचवेळी दहशतवाद्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात २७ सैनिकांचा मृत्यू झाला असून काही सैनिक गंभीर जखमी झाले. अजूनही मृतांची संख्या वाढू शकते असेही अधिकाऱ्याने एएफपीला सांगितले.
इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिका प्रांत (ISWAP) विरुद्धच्या कारवाईसाठी निघालेल्या सैनिकांच्या ताफ्यावर एका आत्मघातकी हल्लेखोराने दाट झाडीत लपवलेल्या स्फोटकांनी भरलेले वाहन आदळवले. हा हल्ला 'टिंबक्टू ट्रँगल' परिसरात झाला.