Netflix Free Trial Pudhari
आंतरराष्ट्रीय

Netflix Lays Off : नेटफ्लिक्सचा कर्मचाऱ्यांना मोठा झटका; तब्बल १,००० कर्मचाऱ्यांची करणार कपात!

प्रॉडक्ट, टेक्नॉलॉजीसह विविध विभागांवर परिणाम

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : जागतिक पातळीवर लोकप्रिय असलेली आघाडीची ओटीटी कंपनी 'नेटफ्लिक्स'ने (Netflix) आपल्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी तब्बल ६ टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. नेटफ्लिक्सच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी नोकरकपात मानली जात आहे.

वृत्तानुसार, या निर्णयामुळे सुमारे १,००० कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. सध्या नेटफ्लिक्समध्ये जगभरात सुमारे १६,००० पूर्णवेळ कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी (Co-CEOs) टेड सारँडोस (Ted Sarandos) आणि ग्रेग पीटर्स (Greg Peters) यांनी बुधवारी सकाळी एका अंतर्गत ईमेलद्वारे कर्मचाऱ्यांना या निर्णयाची माहिती दिली.

या नोकरकपातीचा सर्वाधिक फटका नेटफ्लिक्सच्या प्रॉडक्ट, टेक्नॉलॉजी, लीगल (कायदेशीर) आणि एचआर (HR) विभागांना बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जागतिक मंदीचे सावट आणि डिजिटल मनोरंजन क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कंपनीने खर्च कमी करण्यासाठी हे मोठे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT