Nepal hotel industry loss | नेपाळच्या हॉटेल उद्योगाला 25 अब्जांचा फटका Pudhari File Photo
आंतरराष्ट्रीय

Nepal hotel industry loss | नेपाळच्या हॉटेल उद्योगाला 25 अब्जांचा फटका

पुढारी वृत्तसेवा

काठमांडू : नेपाळमधील ‘जनरेशन झेड’ आंदोलनामुळे देशाच्या हॉटेल उद्योगाला मोठा फटका बसला आहे. विद्यार्थी नेतृत्वाखालील या सरकारविरोधी आंदोलनादरम्यान देशभरातील जवळपास दोन डझन हॉटेल्सची तोडफोड, लूट किंवा जाळपोळ करण्यात आली, ज्यामुळे पर्यटन-आधारित अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या हॉटेल उद्योगाला 25 अब्ज रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. शुक्रवारी एका मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली.

सर्वात जास्त फटका काठमांडूतील हिल्टन हॉटेलला बसला आहे. हॉटेल असोसिएशन नेपाळने जारी केलेल्या निवेदनाचा हवाला देत ‘माय रिपब्लिका’ या वृत्त संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, केवळ हिल्टन हॉटेलचेच 8 अब्ज रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.

मृतांचा आकडा वाढला

नेपाळमधील सरकारविरोधी आंदोलनाचे नेतृत्व करणार्‍या ‘जनरेशन झेड’च्या आंदोलकांनी गुरुवारी संसद विसर्जित करण्याची आणि लोकांच्या इच्छेनुसार घटनेत दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. नेपाळच्या आरोग्य आणि लोकसंख्या मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशव्यापी आंदोलनातील मृतांचा आकडा शुक्रवारी 51 वर पोहोचला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT