आंतरराष्ट्रीय

२०२० मध्ये मंगळासाठी हेलिकॉप्‍टरचे उड्‍डाण : नासा

Pudhari News

वॉशिंग्‍टन : पुढारी ऑनलाईन

आपण पृथ्‍वी सोडून एखाद्या ग्रहावर हेलिकॉप्‍टर उड्‍डाणाची कल्‍पना कधी केली आहे का? केली असेल तरी ती कल्‍पना आता सत्यात उतरू शकते. हे कुठल्या हॉलीवूड चित्रपटातातील कथानक नाही तर वास्‍तव असणार आहे. आपला विश्वास बसणार नाही परंतु, अमेरिकन अंतराळ संशोधन संस्‍था नासा २०२० मध्ये हे दिव्य पेलण्याची तयारी करत आहे. नासाच्या सशोधकांनीच ही माहिती दिली असून पृथ्‍वी सोडून दुसर्‍या ग्रहावर विमान वापरण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. 

रिमोटच्या सहाय्‍याने चालणारे मार्स हेलिकॉप्‍टर मंगळावरील वातावरणात उड्‍डाण करू शकेल अशा पद्धतीने बनवले आहे. तेथील वातावरणात हवा पृथ्‍वीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे या हेलिकॉप्‍टरला काउंटर रोटेटिंग ब्‍लेड वापरण्यात आली आहेत. या लहान हेलिकॉप्‍टरचे वजन १.८ किलो ग्रॅम इतके असणार आहे. एखाद्या चेंडूप्रमाणे दिसणारे हे यान असणार आहे. याची पाती ३ हजार आरपीएम वेगाने फिरतील. जी पृथ्‍वीवरील हेलिकॉप्‍टरपेक्षा १० पट अधिक वेगवान असणार आहेत. 

नासाच्या या प्रकल्‍पाच्या प्रमुख मिमी आंग यांनी सांगितले की, पृथ्‍वीवरून आतापर्यंत हेलिकॉप्‍टरने ४० हजार फुटापर्यंत उड्‍डाण केले आहे. मंगळ ग्रहाचे वायुमंडळ फक्‍त १ टक्‍केच पृथ्‍वीसारखे आहे. त्यामुळे मंगळावर उड्‍डाण केलेले हेलिकॉप्‍टरने कितीही उंचीचे उड्‍डाण केले तरी ते पृथ्‍वीच्या तुलनेत १ लाख फूट उंचीच्या बरोबर असणार आहे. 

Tags : NASA,  helicopter, mars, earth, 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT