पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाच्या सर्बिया प्रांतात गेल्या दहा वर्षांपासून सापडत असलेले खड्यांमुळे शास्त्रज्ञही बुचकळयात पडले आहेत. यातील नव्या खड्याचा शोध यावर्षी ऑगस्टमध्ये लागला आहे. रशियन आर्क्टिकमध्ये असलेले हे खड्डे खूपच रहस्यमय आहेत. काळया कातळात शेकडो फूट सरळ खोल हे पडलेले आहेत. काळया कातळात सरळसोट एखाद्या ड्रिल मशीनने खोदल्यासारखे हे खड्डे दिसतात.
२०१४ पासून असे २० खड्डे सापडले आहेत. उत्तर पश्चिम सायबेरियाच्या यामाल आणि ग्यदान द्वीपकल्पाच्या दुर्गम प्रदेशात हे खड्डे सापडले आहेत. ते कसे निर्माण झाले याचा उलगडा करण्यासाठी शास्त्रज्ञ गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहेत. यासंदर्भात विविध संकल्पना मांडल्या गेल्या आहेत. उल्का पडून हे खड्डे तयार झाले असतील किवा परग्रहवासीयांनी हे खड्डे तयार केले असावेत असाही दावा काही शास्त्रज्ञ करत आहेत.
आता एका अभियंत्यांची टीम, भौतिकशास्त्रज्ञ आणि संगणक शास्त्रज्ञ या खड्डयांवर सध्या संशोधन करत आहेत. त्यांनी काही निष्कर्ष मांडले आहेत. टुन्ड्रा प्रदेशात भूर्गभातील मिथेन वायूवर जेव्हा दाब पडतो व पृथ्वीच्या अंतर्गत तापमानाचा यावर परिणाम होतो व अतिउच्चदाबाने हे वायू बाहेर पडतात त्यावेळी हे खड्डे तयार होत असावेत. असा अंदाज आहे आता हा दाब कशाने तयार होत आहे यावर संशोधन सरू आहे.
ॲना मार्गोडा हे केंब्रीज विद्यापीठातील रसायन शास्त्रज्ञ,त्यांनी निष्कर्ष काढला आहे की भूगर्भात रासायनिक प्रक्रिया होऊन हे खड्डे तयार झाले असतील पण रासायनिक प्रक्रीयेचे कोणतेही पुरावे यामध्ये दिसत नाहीत. मिथेन हायड्रेट हे मूलद्रव्य घनरुपात या खड्डयांभोवती सापडत आहे. एकूणच अनेक शास्त्रज्ञांनाही या खड्डयांचे कोडे शोधण्यात अपयश येत आहे. व दहा वर्षांपासून हे खड्डे रहस्यमय पद्धतीने तयार होत आहेत.