रंगून/म्यानमार : वृत्तसंस्था
३३४ अणुबॉम्बच्या स्फोटाच्या क्षमतेऐवढा म्यानमारला भूकंपचा झटका बसल्याने आणखी महिनाभर या देशाला भूकंपाचे हादरे बसणार असल्याचा इशारा भूगर्भशास्त्रज्ञांनी दिला आहे. दरम्यान, ७२ तासानंतरही भूकंपाचे सत्र सुरू असून रविवारी पुन्हा हा देश भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. (Myanmar Earthquake)
भूकपाचा केंद्रबिंदू म्यानमारमधील मंडाले शहराजवळ नोंदविला आहे. अणुबॉम्बच्या ऊर्जेइतक्या तीव्रतेचा झटका बसल्याने म्यानमार पाठोपाठ थायलंडमध्येही मोठी वित्तहानी झाली आहे. या दोन्ही देशांसह चीन, भारत आणि बांगला देशातही काही प्रमाणात भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. म्यानमारमधील भूकंप बळींची संख्या १७ वर गेल्याचे वृत्त आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी पुन्हा म्यानमारला ५.१ रिश्टर स्केएल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले. यामुळे नागरिकांमध्ये घबराट कायम आहे.
रंगून : भूकंपाच्या तडाख्यात पॅगोडा या बौद्ध मठासही हानी पोहोचली आहे. या मठाच्या दुरुस्तीसाठी बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे.
म्यानमार आधीच दीर्घकाळ सुरू असलेल्या गृहयुद्धामुळे आणि आर्थिक संकटामुळे त्रस्त आहे. २०२१ मध्ये लष्कराने सत्ता बळकावल्यापासून देशात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता आहे. सुमारे ३० लाखांहून अधिक नागरिक बेघर झाले आहेत आणि अन्न व आरोग्य सुविधांचा मोठा तुटवडा भासत आहे. दरम्यान, भूकंपानंतर म्यानमारच्या विरोधी पक्षीय सैन्य गटाने दोन आठवड्यांसाठी युद्धविराम जाहीर केला आहे, जेणेकरून बचाव आणि मदतकार्य सुरळीतपणे पार पाडता येईल.
अणुबॉम्बच्या स्फोटासारख्या भूकंपांमधून बाहेर पडणारी ऊर्जा अत्यंत विध्वंसक असते. हा भूकंप भारतीय टेक्टोनिक प्लेट आणि भारताकडून ६० टन सामग्री रवाना
• या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भारताने तातडीने 'ऑपरेशन ब्रह्मा' अंतर्गत मदत कार्य सुरू केले आहे.
• भारतीय लष्कराने ११८ सदस्यांचे एक वैद्यकीय पथक आणि ६० टन मदत सामग्रीही तिथे पोहोचवली आहे.
यूरेशियन प्लेटच्या टक्करामुळे निर्माण झाला आहे. ही हालचाल सुरूच राहिल्यास येत्या काही महिन्यांत आणखी धक्के जाणवण्याची शक्यता भूगर्भशास्त्रज्ञांनी वर्तविली आहे.