भूकंपाने म्यानमारमध्ये प्रचंड विध्वंस! ६९४ लोकांचा बळी, रुग्णालयांमध्ये रक्ताचा मोठा तुटवडा  file photo
आंतरराष्ट्रीय

भूकंपाने म्यानमारमध्ये प्रचंड विध्वंस! १००२ लोकांचा बळी, २३७६ जखमी

Myanmar Earthquake | रुग्णालयांमध्ये रक्ताचा मोठा तुटवडा, भारताने पाठवली मदत

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : Myanmar Earthquake | म्यानमार आणि थायलंड देशात झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. एकट्या म्यानमारमध्ये भूकंपात १००२ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो लोक बेपत्ता आहेत. या भूकंपात आतापर्यंत २३७६ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. दुसरीकडे, थायलंडमध्ये भूकंपामुळे सुमारे १० जणांचा मृत्यू झाला आहे. या अचानक आलेल्या आपत्तीनंतर म्यानमारमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. या भयानक भूकंपाने म्यानमारसह शेजारील देशही हादरले आहेत. आज सकाळी अफगाणीस्तानमध्येही भूकंपाचे धक्के बसले. भारत, चीन आणि नेपाळसह सहा देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

शुक्रवारी म्यानमार आणि थायलंड हे दोन्ही देश ७.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरले. दिवसभरात एकामागून एक चार भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर म्यानमारमध्ये पुन्हा एकदा रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के बसले. शुक्रवारी रात्री १२ वा. च्या सुमारास ४.२ तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला. भूकंपाचा सर्वाधिक फटका थायलंडमधील बँकॉकला बसला आहे. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून, बँकॉकमधील एक ३० मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. त्याच्या ढिगाऱ्याखाली ९० मजूर गाडले गेले. म्यानमारमध्ये अनेक ठिकाणी या भूकंपात रस्ते उखडले गेले. घरे आणि अपार्टमेंट कोसळल्या. त्यात हजारो लोक बेपत्ता आहेत. आतापर्यंत म्यानमारमध्ये १००२ मृतदेह सापडले तर थायलंडमध्ये १० मृतदेह सापडले आहेत. दोन्ही देशात मिळून सुमारे २३७६ जणांवर उपचार सुरू आहेत. दोन्ही देशांच्या आपत्कालीन सेवेच्या अधिकाऱ्यांनी आणखी शेकडो जण मृत्युमुखी पडले असावेत, अशी भीती व्यक्त केली आहे. दरम्यान, आज सकाळी ५.१६ वाजता अफगाणिस्तानात ही ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला.

आणीबाणी जाहीर

या भूकंपामुळे थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा यांनी बँकॉकमध्ये आणीबाणी जाहीर केली. काही मेट्रो आणि लाईट रेल्वेसेवा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या, ज्यामुळे बँकॉकची वाहतूक व्यवस्था अधिक बिघडली.

सकाळी ११:५० वाजता पहिला भूकंप

पहिला भूकंप सकाळी ११:५० वाजता झाला, त्याची तीव्रता ७.२ इतकी होती. यानंतर, दुसरा भूकंप दुपारी १२:०२ वाजता आला, त्याची तीव्रता ७ इतकी होती. त्यानंतर, प्रत्येकी एक तासाच्या अंतराने आणखी दोन भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, पहिल्या दोन भूकंपांचे केंद्र जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर होते, तर तिसरा भूकंप जमिनीखाली २२.५ किलोमीटर खोलीवर झाला.

भारताने पाठवली मदत

एअर फोर्स स्टेशन हिंडन येथून आयएएफ सी १३० जे विमानाने म्यानमारला सुमारे १५ टन मदत साहित्य पाठवले आहे. ज्यामध्ये तंबू, स्लीपिंग बॅग्ज, ब्लँकेट, तयार जेवण, पाणी शुद्धीकरण करणारे यंत्र, स्वच्छता किट, सौर दिवे, जनरेटर सेट, आवश्यक औषधे (पॅरासिटामॉल, अँटीबायोटिक्स, कॅन्युला, सिरिंज, हातमोजे, कापसाच्या पट्ट्या, इ.) यांचा समावेश आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT