Elon Musk, AI
जगातील सर्वात शक्तिशाली AI लवकरच  Pudhari Photo
आंतरराष्ट्रीय

मस्क यांची मोठी घोषणा; जगातील सर्वात शक्तिशाली AI लवकरच

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : एलन मस्क (Elon Musk) यांनी आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट करत एक मोठी घोषणा केली आहे. एलन मस्क यांच्या एआय  (AI) कंपनीने जगातील सर्वात शक्तिशाली एआय  (AI)  चे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेतील टेनेसी राज्यातील सर्वात मोठे शहर असलेल्या मेम्फिसमध्ये हे प्रशिक्षण सुरू झाले आहे. हे एआय  (AI) तब्बल १ लाख चिप्सचा वापर करुन तयार केले गेले आहे.

एलन मस्क यांच्या एआयचे नाव काय आहे?

एलन मस्क यांचे जगातील सर्वात शक्तिशाली एआय येत आहे. अमेरिकेतील टेनेसी शहरात प्रशिक्षण सुरू आहे. इलॉन मस्क यांचा एआय  उपक्रम हा xAI आहे. त्याच्या एआय प्लॅटफॉर्मचे नाव ग्रोक (Grok) आहे. याबाबत कंपनीचा दावा आहे की हा जगातील सर्वात शक्तिशाली एआय क्लस्टर आहे. खुद्द इलॉन मस्क यांनी ही घोषणा केली आहे.

या शहरात एक प्रणाली स्थापित करण्यात आली आहे, ज्यामध्ये 1,00,000 Nvidia H100 AI चिप्स वापरण्यात आल्या आहेत. एलोन मस्कने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. यासाठी त्यांनी xAI टीम, X टीम आणि  एनव्हीडिया कंपनीचे (NVIDIA)  आभार मानले आहेत.

सर्वांना एआय चा फायदा होईल ?

एलन मस्क यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, " जगातील सर्वात शक्तिशाली एआयचा सर्वांना फायदा होईल. याची सुरुवात या डिसेंबरपासून होऊ शकते. मेम्फिसमध्ये ग्रोकचे प्रशिक्षण दिले जात आहे. याचा लाभ सर्वांना घेता येईल. माहितीनुसार, मस्क यांना स्वतःचे डेटा सेंटर बनवायचे आहे आणि ते एआय चिप्स देखील खरेदी करत आहेत.

SCROLL FOR NEXT