Image Source X
आंतरराष्ट्रीय

मुंबईकडे येणारे विमान तुर्कीमध्ये अडकले, २५० प्रवाशांचे हाल

Indian passengers stuck | ४४ तास प्रवासी विमानतळावर ; स्‍वच्छतागृहाबरोबर, खाण्यासही काही मिळेना

Namdev Gharal

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

लंडनमधील हिथ्रो विमानतळावरून मुंबईकडे निघालेले एक प्रवासी विमान तुर्कीतील दियारबाकीर विमानतळावर अडकून पडले आहे. या विमानात मेडिकल इमरजन्सी आल्‍यामुळे ते तुर्कीतील दियारबाकीर विमानतळावर उतरले होते. पण गेली ४४ तास ते तेथे अडकले आहे. दरम्‍यान या विमानातून प्रवास करणार्‍या २५० प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. व्हर्जिन अटलांटिक या कंपनीचे हे विमान आहे. यातील अनेक प्रवासी हे भारतीय आहेत.

२ एप्रील रोजी या विमानाने लंडनमधील हिथ्रो विमानतळावरून उड्डाण केले होते. ते त्‍याच दिवशी मुंबई येथे उतरणे अपेक्षित होते पण. प्रवासादरम्‍यान मध्येच तुर्कीमधील दियाबाकीर या लष्‍करी विमानतळावर ते उतरण्यात आले. त्‍यानंतर त्‍या विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्‍याने त्‍याचे उड्डाण होऊ शकलेले नाही. पण त्‍या मनस्‍ताप प्रवाशांना होत आहे. जवळपास दोन दिवस ते तिथे अडकले असून त्‍यांच्या राहण्याची व खान्याचीही व्यवस्‍था कंपनीने केलेली नाही. हनुमान दास नावाच्या एका व्यक्‍तिने याबाबतची एक्‍सवर पोस्‍ट केली आहे. यामध्ये त्‍यांनी कंपनीच्या गलथान कारभारावर टीका केली आहे. त्‍याचे कुंटुंबिय या विमानात प्रवास करत होते. कपंनीने अमानुषपणे प्रवाशांशी व्यवहार केल्‍याचा आरोप केला आहे.

दक्षिण तुर्कीमध्ये दियाबाकीर नावाचा छोटासे विमानतळ असून ते लष्‍काराचे आहे. त्‍या विमानतळावर पुरेशा सुविधा उपलब्‍ध नाही त्‍यामुळे विमानातील प्रवाशांच चांगलेच हाल झाले आहेत. विमानतळावर एकच स्‍वच्छतागृह आहे. तसेच झोपण्यसही पुरेशी जागा नाही त्‍यामुळे जागा मिळेल तेथे प्रवसी झोपल्‍याचे दिसून येत आहे. दरम्‍यान आज संध्याकाळी हे विमान मुंबई येथे पोहचेल असे कंपनीने सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT