पाकिस्‍तान गुप्‍तचर संस्‍थेचा (ISI) एजंट मुफ्‍ती शाह मीर, दुसर्‍या छायाचित्रात कुलभूषण जाधव.  (Image source- X)
आंतरराष्ट्रीय

कुलभूषण यांना पाकच्‍या ताब्‍यात देणार्‍या 'ISI' एजंटची गोळ्या झाडून हत्‍या

बलुचिस्‍तानमध्‍ये अज्ञात हल्लेखोरांचे कृत्‍य

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण करुन पाकिस्‍तानच्‍या ताब्‍यात देणारा पाकिस्‍तान गुप्‍तचर संस्‍थेचा (ISI) एजंट मुफ्‍ती शाह मीरची ( Mufti Shah Mir) अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. यासंदर्भातील वृत्त पाकिस्‍तानमधील दैनिक 'डॉन'ने दिले आहे.

अज्ञात बंदुकधार्‍यांकडून गोळ्या झाडून हत्या

दहशतवादी मुफ्ती शाह मीर हा आयएसआयचा एजंट म्‍हणून काम करत होता. तो भारताविरुद्ध कट रचण्यासाठी त्‍याचा वापर करण्‍यात येत होता. प्रयत्न करत आहेत. कुलभूषण जाधव यांच्या इराणमधून अपहरण करण्यात मुफ्ती शाह मीर यानेच कट रचला होता. त्‍याची शुक्रवारी रात्री बलुचिस्तानमधील तुर्बत येथे मशिदीतून बाहेर पडत असताना दुचाकीवरुन आलेल्‍या अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्‍याच्‍यावर गोळ्या झाडल्‍या. तो जागीच ठार झाला.

मीरवर मानवी तस्‍करीसह अनेक गंभीर गुन्‍हे दाखल

मुफ्ती शाह मीर याच्‍यावर मानवी तस्करीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. तो जमियत उलेमा-ए-इस्लाम या इस्लामी कट्टरपंथी राजकीय पक्षाचा सदस्य होता. तो आयएसआयसाठी अनेक मोठी कामे केली आणि अनेक बलुच तरुणांच्या अपहरण आणि न्यायालयीन हत्येत त्‍याचा सहभाग होता. बलुचिस्तानमधील दहशतवाद कारवायांमध्‍ये त्‍याचा सहभाग होता.

'आयएसआय'ने 2016 मध्ये कुलभूषण जाधव यांना घेतले होते ताब्यात

मार्च २०१६ मध्ये कुलभूषण जाधव यांचे इराण-पाकिस्तान सीमेवरून जैश अल-अदलच्या मुल्ला उमर इराणीच्या नेतृत्वाखालील गटाने अपहरण केले होते. यानंतर मीरच्‍या मध्यस्थांमार्फत कुलभूषण यांना पाकिस्तानी लष्कराच्या स्वाधीन करण्‍यात आले होते. नोव्हेंबर २०२० मध्ये तुर्बतमध्‍ये आयएसआयने ओमर इराणी आणि त्यांच्या दोन मुलांची कथितपणे हत्या केली होती. मागील काही काळापासून सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षात आयएसआयनेच मीरची हत्या केल्याचा संशय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT