आफ्रिकेत उद्रेक झालेल्या एमपॉक्स विषाणूचा आता जगभर फैलाव होऊ लागला आहे.  (Image source- WHO)
आंतरराष्ट्रीय

आफिक्रेत उद्रेक झालेल्या Mpox चे संकट भारताच्या वेशीवर धडकले

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

आफ्रिकेत उद्रेक झालेल्या एमपॉक्स म्हणजचे मंकीपॉक्स विषाणूचा आता जगभर फैलाव होऊ लागला आहे. पाकिस्तानमध्ये एमपॉक्स विषाणूचे तीन रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती खैबर पख्तूनख्वा प्रांतातील आरोग्य विभागाने शुक्रवारी दिली आहे. याबाबतचे वृत्त रॉयटर्सन दिले आहे.

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधील एमपॉक्स या व्हायरल संसर्गाच्या नव्या व्हेरिएंटचा उद्रेक अनेक देशांमध्ये पसरला आहे. या पार्श्वभूमीवर ही आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब असल्याचे सांगत जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली.

यूएईतून आलेल्या रुग्णांना संसर्ग

संयुक्त अरब अमिरातीहून आलेल्या रुग्णांमध्ये एमपॉक्स विषाणूजन्य संसर्ग आढळून आला असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये यापूर्वी एमपॉक्सची प्रकरणे आढळून आली होती. पण रुग्णांमध्ये कोणच्या व्हेरिएंटचा संसर्ग आढळला हे त्वरित स्पष्ट झाले नव्हते.

पाकिस्तानात दोघांना लागण

खैबर पख्तुनख्वाच्या आरोग्य सेवा महासंचालक सलीम खान यांनी सांगितले की, दोन रुग्णांना एमपॉक्सची लागण झाली असल्याची पुष्टी झाली आहे. तिसऱ्या रुग्णाचे नमुने इस्लामाबादमधील राष्ट्रीय आरोग्य संस्थेकडे पुष्टी करण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. तिन्ही रुग्णांना वेगळे ठेवण्यात आले आहे.

आफ्रिकेत Mpox ने १,१०० हून अधिक रुणांचा मृत्यू

जानेवारी २०२३ मध्ये एमपॉक्सचा उद्रेक सुरू झाला होता. तेव्हापासून काँगोमध्ये एमपॉक्सची २७ हजार प्रकरणे आढळून आली आहेत. तर १,१०० हून अधिक रुणांचा मृत्यू झाला आहे. गंभीर बाब म्हणजे बाधितांमध्ये मुलांचे प्रमाण अधिक आहे.

आफ्रिकेतील अनेक देशांत एमपॉक्सचा संसर्ग

आफ्रिकेतील अनेक देशांत एमपॉक्सचा संसर्ग पसरला आहेत. यापैकी ९६ टक्क्यांहून अधिक प्रकरणे एकट्या काँगोमध्ये आढळून आली आहेत. याचदरम्यान, आता काँगोमधून Mpox च्या एका नवीन व्हेरिएंटचा फैलाव होऊ लागला आहे. यामध्ये मृत्यूचे प्रमाण सुमारे ३-४ टक्के आहे. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने काँगो आणि आफ्रिकन देशांमध्ये Mpox च्या उद्रेकाला आणीबाणी घोषित म्हणून घोषित केले आहे. गंभीर बाब म्हणजे, आफ्रिकन खंडात हा विषाणू नियंत्रणात आणण्यासाठी कमी प्रमाणात लस उपलब्ध आहे.

mpox ची लक्षणे काय?

  • Mpox जवळच्या संपर्कातून पसरू शकतो.

  • सामान्यतः सौम्य असताना, दुर्मिळ प्रकरणांमध्ये तो जीवघेणा ठरू शकतो.

  • फ्लूसारखी लक्षणे दिसून येतात.

  • शरीरावर पुरळ उठतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT