Mozambique boat accident
नवी दिल्ली: पूर्व आफ्रिकेतील देश मोझांबिकमधील बेरा बंदरात बोट उलटल्याने तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि पाच जण बेपत्ता आहेत. भारतीय उच्चायुक्तालयाने ही माहिती दिली आहे.
हा अपघात शुक्रवारी ऑफशोअर नांगरलेल्या एका टँकरकडे कर्मचाऱ्यांची नियमित बदली सुरू असताना झाला. बोटीत एकूण चौदा भारतीय नागरिक होते आणि ती नेमक्या कोणत्या कारणांमुळे उलटली हे अद्याप निश्चित झालेले नाही.
उच्चायुक्तालयाच्या माहितीनुसार, शुक्रवारी समुद्र किनाऱ्यावर नांगरलेल्या टँकरवर नियमित क्रू ट्रान्सफर दरम्यान हा अपघात झाला. बोट उलटली तेव्हा त्यात चौदा भारतीय होते. मात्र, नेमक्या कोणत्या कारणामुळे ही बोट उलटली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पाच जणांना वाचवण्यात यश
या अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. पाच भारतीयांना वाचवण्यात यश आले असून ते सुरक्षित असल्याची माहिती उच्चायुक्तालयाने दिली आहे. त्यापैकी एका व्यक्तीवर बेरा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बेपत्ता भारतीयांचा शोध सुरू
बेपत्ता असलेल्या पाच भारतीयांचा शोध घेण्यासाठी भारतीय उच्चायुक्तालय स्थानिक प्रशासन आणि सागरी संस्थांशी समन्वय साधून आहे. तसेच, मृत झालेल्या भारतीयांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली जात असून, उच्चायुक्तालयाने या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.
उच्चायुक्तालयाने पोस्टमध्ये म्हटले आहे, "बेरा बंदराजवळ झालेल्या बोट अपघातात तीन भारतीय नागरिकांसह ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्याबद्दल आम्ही मनापासून शोक व्यक्त करतो. या दुर्दैवी अपघातात ज्यांनी प्राण गमावले आहेत, त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात असून त्यांना सर्वतोपरी मदत करत आहे."