जगात सर्वाधिक महागडे हेअर कटिंग. Pudhari File Photo
आंतरराष्ट्रीय

केस कापण्यास 5530 रुपये!

जगात सर्वाधिक महागडे हेअर कटिंग नार्वेमध्ये; जपान दुसर्‍या स्थानी

पुढारी वृत्तसेवा

जगातील अनेक देशात केश कर्तन अर्थात हेअर कटिंग महागडे आहे. भारतापेक्षा अनेक देशात हेअर कटिंगसाठी दहा पटीने दर आकारले जातात. तर काही देशात भारतापेक्षा कमी दर घेतला जातो. जगामध्ये नार्वेमध्ये हेअर कटिंगसाठी सर्वाधिक पैसे घेतले जातात. नॉर्वेतील सलूनमध्ये हेअर कटिंगसाठी 64.50 डॉलर अर्थात 5530 रुपये आकारले जातात.

दिल्लीत 453 रुपये

दिल्लीमध्ये हेअर कटिंगसाठी 454 रुपये घेतले जातात. अर्थात वृक्षाखाली बसून केश कर्तन करणार असल्यास 50 रुपयांतही काम भागते. मात्र, या ठिकाणी जगातील उत्कृष्ट सलूनमधील हेअर कटिंगच्या दराचा आढावा घेत आहोत.

जपानमध्ये 56 डॉलर

नार्वेपाठोपाठ जगात जपानमध्ये केश कर्तनालयासाठी सर्वाधिक पैसे घेतले जातात. जपानमध्ये हेअर कटिंगसाठी 56 डॉलर आकारले जातात. डेन्मार्क, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, स्वित्झर्लंडमध्ये हेअर कटिंगसाठी 40 डॉलर्सहून अधिक रक्कम आकारली जाते.

अन्य देशांतील दर

फ्रान्स, दक्षिण कोरिया, इंग्लड, जर्मनी, ऑस्ट्रिया, फिनलँडमध्ये केश कर्तन करायचे असल्यास 30 डॉलर मोजावे लागतात. आयर्लंड, चेक गणराज्य, कॅनडा, पोलंड, पोर्तुगाल, इटली, स्पेन, सौदी अरेबियामध्ये हेअर कटिंगचे दर 20 डॉलरपर्यंत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT