(Representative image)   (Representative image)
आंतरराष्ट्रीय

फूकट पेट्रोलची 'हाव' जीवावर बेतली..! नायजेरियात पेट्रोल टँकर स्फोटात ९० ठार

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आफ्रिकेतील नायजेरिया देशात फूकट पेट्रोल मिळवण्‍याची हाव तब्‍बल ९० जणांचा जीवावर बेतली आहे. पेट्रोल टँकर स्फोटात ९० जण ठार झाल्‍याचे वृत्त 'एपी'ने दिले आहे. या दुर्घटनेत ५० हून अधिक जण गंभीर जखमी असल्‍याने मृतांचा आकडा वाढण्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे.

पेट्रोल टँकरला अपघात झाला. तो पलटी झाला. यावेळी फूकटचे पेट्रोल मिळण्‍यासाठी लोकांची झुंबड उडाली. या गर्दीत स्‍फोट झाल्‍याने ९० जण ठार तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. रहे थे।

जिगावा राज्यातील माजिया शहरात मध्यरात्री हा स्फोट झाला, जेव्हा विद्यापीठाजवळील महामार्गावरून प्रवास करताना टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. टँकर पलटी झाला. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी टँकरकडे धाव घेतली. ते पेट्रोल काढू लागले. याचवेळी प्रचंड मोठा स्‍फोट झाला. भीषण आग लागली. या आगीत९० पेक्षा अधिक लोक ठार झाले आहेत, अशी माहिती पोलिस प्रवक्ते लावन ॲडम यांनी दिल्‍याचे वृत्त 'एपी'ने दिले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT