मोदींचे यजमान, बुनोईचे सुलतान 2250 कोटींच्या पॅलेसचे मालक File Photo
आंतरराष्ट्रीय

मोदींचे यजमान, बुनोईचे सुलतान 2250 कोटींच्या पॅलेसचे मालक

हसनल बोल्किया यांची संपत्ती ३० अब्ज डॉलरवर

सोनाली जाधव

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुनोई (PM Modi Brunei Visit) दौऱ्यावर गेले आहेत. संपूर्ण जगात गर्भश्रीमंत म्हणून परिचित असलेले बुनोईचे सुलतान हसनल बोल्किया यांनी मोदी यांना खास निमंत्रण दिले आहे. ऐशोआरामी जीवनशैलीमुळे जगभरात सुपरिचित असलेल्या हसनल यांच्याविषयी थोडक्यात माहिती.

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

१९८४ साली बुनोईला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले. त्यांच्या प्रासादाची किंमत २२५० कोटी आहे. इस्ताना नुरूल इमान असे त्यांच्या पॅलेसचे नाव आहे. हसनल यांचा प्रासाद जगातील सर्वात भव्य प्रासाद मानला जातो. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या प्रासादाची नोंद आहे.

२० लाख चौरस फुट क्षेत्रामध्ये हा शाही प्रासाद देश स्वातंत्र्य झाल्यावर बांधण्यात आला आहे. या प्रासादामध्ये १७०० सूट आहेत. यामध्ये पाच स्विमिंग पूल असून २०० घोड्यांसाठी वातानुकुलित तबेला आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

१९८० पर्यंत सुलतान हसनल जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. इंधन साठे आणि नैसर्गिक वायू हे त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत. त्यांच्याकडे ७ हजारआलिशान गाड्या असून यामध्ये ३०० फरारी आणि ५०० रॉयल रॉस या अति महागड्या वाहनांचा समावेश आहे. त्यांची किंमत अब्ज अमेरिकन डॉलर आहे. बोईंग ७४७ जातीचे त्यांच्याकडे स्वतःचे विमान आहे. या विमानासाठी त्यांनी ३ हजार कोटींचा खर्च केला आहे. या विमानाला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT