Miss Universe 2025 | मेक्सिकोची फातिमा बॉश-फर्नांडिस बनली ‘मिस युनिव्हर्स 2025’ 
आंतरराष्ट्रीय

Miss Universe 2025 | मेक्सिकोची फातिमा बॉश-फर्नांडिस बनली ‘मिस युनिव्हर्स 2025’

पुढारी वृत्तसेवा

बँकॉक; वृत्तसंस्था : मेक्सिकोची फातिमा बॉश-फर्नांडिस ही तरुणी ‘मिस युनिव्हर्स 2025’ बनली आहे. थायलंडमध्ये पार पडलेल्या 74 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत शंभरहून अधिक देशांतील स्पर्धकांना मागे टाकत 26 वर्षांच्या फातिमाने हा मुकुट मिळवला. भारताच्या मनिका विश्वकर्माने उत्कृष्ट कामगिरी केली आणि टॉप 30 मध्ये पोहोचली; परंतु टॉप 12 मध्ये स्थान मिळवण्यात तिला अपयश आले.

चार फेर्‍यांनंतर, पहिल्या पाचमध्ये थायलंडची प्रवीनर सिंह, फिलिपाईन्सची अतिसा मनालो, व्हेनेझुएलाची स्टेफनी अब्साली, मेक्सिकोची फातिमा बॉश-फर्नांडिस आणि कोट डीआयव्होअरच्या ऑलिव्हिया यासे यांचा समावेश होता, त्यानंतर मेक्सिकोच्या फातिमा बॉश-फर्नांडिसला मिस युनिव्हर्स 2024 व्हिक्टोरिया थेलविगने मुकुट घातला. मिस युनिव्हर्स 2025 मध्ये थायलंडची प्रवीनर सिंह दुसर्‍या क्रमांकावर आली, तर व्हेनेझुएलाची स्टेफनी अब्साली तिसर्‍या क्रमांकावर आली. फिलिपाईन्सची अतिसा मनालो चौथ्या क्रमांकावर आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT