2026 मध्ये इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. अमेरिकेने ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ अंतर्गत इराणच्या अणुकेंद्र आणि लष्करी तळांना लक्ष्य केल्यामुळे जगाची दोन प्रमुख गटांत विभागणी झाली आहे.
या गटाचे नेतृत्व अमेरिका करत असून, पाश्चात्य राष्ट्रे त्यांना तांत्रिक आणि सामरिक पाठिंबा देत आहेत.
प्रमुख आक्रमक : अमेरिका आणि इस्रायल. अमेरिकेने भूमध्य समुद्रात आपली पाचवी आणि सहावी नौदल ताफा तैनात केला आहे.
युरोपीय सहभाग : ब्रिटनने आपल्या एचएमएस ड्रॅगन युद्धनौका आणि एचएमएस क्विन एलिझाबेथ या युद्धनौकांद्वारे इस्रायलला सुरक्षा कवच दिले आहे. फ्रान्सने त्यांचे ‘चार्ल्स द गल्ल’ हे विमानवाहू जहाज संरक्षणात्मक कारवायांसाठी धाडले आहे.
तळ आणि लॉजिस्टिक : जर्मनी आणि इटलीने त्यांच्या देशातील अमेरिकन हवाई तळांचा वापर इराणवरील हल्ल्यांसाठी करण्यास परवानगी दिली आहे.
गुप्तचर सहकार्य : जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी इराणच्या सायबर हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलला डेटा शेअरिंगमध्ये मदत केली आहे.
इराण थेट युद्धापेक्षा आपल्या प्रॉक्सी म्हणजे हस्तक गटांद्वारे इस्रायल आणि अमेरिकेला वेढण्याचा प्रयत्न करत आहे.
रशिया आणि चीनचा कल : रशियाने इराणला प्रगत एस-400 हवाई संरक्षण प्रणाली पुरवून तांत्रिक मदत केली आहे. चीनने उघडपणे युद्धात सहभाग घेतला नसला, तरी इराणकडून तेल खरेदी सुरू ठेवून त्यांची अर्थव्यवस्था कोसळण्यापासून वाचवली आहे.
सीरिया आणि इराक : या दोन्ही देशांच्या भूमीचा वापर इराण आपल्या लष्करी हालचालींसाठी आणि क्षेपणास्त्रे डागण्यासाठी करत आहे.
सशस्त्र गट : लेबनॉनमधील हिजबुल्ला, येमेनचे हुथी बंडखोर आणि गाझातील उरलेले सशस्त्र गट एकाच वेळी इस्रायलवर हल्ले करत आहेत. हुथींनी लाल समुद्रात जागतिक व्यापाराला मोठी खीळ घातली आहे.
3. अरब राष्ट्रे दुटप्पी
सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि जॉर्डन यांसारख्या देशांची स्थिती अत्यंत नाजूक आहे.
एकीकडे ते इराणच्या वाढत्या प्रभावामुळे धास्तावलेले आहेत, म्हणून ते अमेरिकेला हवाई हद्दीचा वापर करू देत आहेत.
दुसरीकडे, आपल्या देशातील जनता इस्रायलविरोधी असल्याने ते उघडपणे युद्धाचे समर्थन करणे टाळत आहेत.
जबरदस्त हवाई शक्ती : अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या महत्त्वाच्या लष्करी पायाभूत सुविधांचे 80% नुकसान केल्याचा दावा.
जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत : हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात केलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे जागतिक तेल आणि मालवाहतुकीचा खर्च 40% नी वाढला.
रशिया-इराण लष्करी करार : इराणला रशियाकडून आधुनिक सुखोई (एसयू-35) लढाऊ विमाने आणि रडार यंत्रणा पुरवल्या गेल्याची माहिती.
मध्यस्थांची अयशस्वी धडपड : कतार आणि ओमानने युद्धविराम घडवून आणण्याचे केलेले प्रयत्न अद्याप निष्फळ ठरले आहेत.