दहशतवादी मसूद अझर Pudhari File Photo
आंतरराष्ट्रीय

Masood Azhar : आमच्याकडे हजारो आत्मघाती हल्लेखोर, मसूद अझहरची धमकी; ऑडिओनंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट

पुढारी वृत्तसेवा

इस्लामाबाद : आमच्याकडे हजारो आत्मघाती हल्लेखोर तयार असल्याचा दावा पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने पुन्हा एकदा केला आहे. या संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहरच्या आवाजातील एक ऑडिओ संदेश प्रसिद्ध झाला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर समोर आलेल्या या ऑडिओत संघटनेकडे हल्ले करण्यासाठी ‌‘हजारो‌’ आत्मघाती हल्लेखोर तयार आहेत, अशी धमकी देताना तो दिसत आहेे. या माध्यमातून आपली ताकद किती आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करताना दिसतो. या ऑडिओ संदेशानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत.

या संदेशात अझहर त्याच्या दहशतवादी संघटनेबद्दल मोठमोठे दावे करताना दिसतो. आमच्याकडे एक, दोन, शंभर, हजारही नव्हे, तर आत्मघाती हल्लेखोरांची खरी संख्या उघड केल्यास जागतिक माध्यमांमध्ये खळबळ उडेल. माझी भरती करा, आम्हाला पैसा नको, युरोप-अमेरिकेचा व्हिसा नको किंवा अन्य काही लाभ नकोत. आम्हाला फक्त ईश्वराकडून ‌‘हौतात्म्य‌’ (शहादत) हवे आहे, अशी विनंती अनेकजण मला करतात, असे अझहरने या व्हिडीओत म्हटले आहे.

अझहरचा दावा काय?

जैशमध्ये भरतीसाठी रांग लागली असल्याचा दावा अझहरने या व्हिडीओत केला आहे. आम्हाला युरोप-अमेरिकेचा व्हिसा नको, पैसे नकोत, मालमत्ता किंवा उदरनिर्वाहासाठी एखादे दुकानही नको, आमच्यावरील कर्ज फेडण्यासाठी पैसे नको आहेत. आम्हाला केवळ ईश्वराची सेवा करायची आहे. गाडी नको किंवा आयफोनही नको. आम्हाला ईश्वराकडून ‌‘हौतात्म्य‌’ (शहादत) हवे आहे. त्यासाठी लवकरात लवकर संधी द्या, अशी विनंती अनेकजण करत असल्याचे तो या व्हिडीओत सांगतो.

अझहरची हतबलता

या कथित संदेशाची नेमकी तारीख आणि सत्यता पडताळता आलेली नाही; मात्र सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या असून, ऑडिओ नेमका कधी प्रसारित झाला आहे, याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. धमकीपेक्षा या व्हिडीओमध्ये अझहर हतबल झाल्यासारख्याच वाटतेो. ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’दरम्यान भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील जैशच्या ठिकाणांवर, बहावलपूरमधील मुख्यालयासह हल्ले केले होते. यामध्ये अझहरचे जवळचे अनेक नातेवाईक मारले गेले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जैशने पहिल्यांदाच या नुकसानीची अप्रत्यक्षपणे कबुली दिली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT