Empire State Building proposal 
आंतरराष्ट्रीय

Empire State Building proposal | 1450 फूट उंचावर प्रेयसीला केले प्रपोज : न्युयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या टोकावरील थरार!

रशियन जोडप्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, जोडपे उंच इमारतीवर चढणारे स्टंटमॅन, दोघेही झळकले आहेत नेटफ्लिक्सवर, जागतिक माध्यमांमध्ये चर्चेचा विषय

Namdev Gharal

न्यू यॉर्क: प्रेमासाठी वाटेल ते करायला लोक तयार असतात याचाच प्रत्‍यय आज जगाला आला. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी एका जोडप्याने गाठली थेट न्युर्याकमधील एक गंगनचुंबी इमारतच. या रशियन जोडप्याने केलेला हा कारनामा मात्र बेकायदेशिर असल्याने पोलिसांनी त्‍यांना बेड्या ठोकल्या आहेत. आपल्या प्रेमासाठी केलेल्या स्टंटमुळे या रशियन जोडप्याची चर्चा मात्र जगभरात रंगली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, न्यू यॉर्कमधील प्रसिद्ध असलेल्या 'एम्पायर स्टेट बिल्डिंग'वर (Empire State Building) एका रशियन जोडप्याने सुरक्षेच्या सर्व भिंती भेदून थेट इमारतीवरील अँटेनाच्या टोकावर चढाई केली. जमिनीपासून तब्बल १,४५४ फूट (४४३ मीटर) उंचीवर, अत्यंत वेगवान वाऱ्यात कोणताही सुरक्षा दोर न वापरता या तरुणाने तरुणीला प्रपोज केले. हा थरारक स्टंट सध्या जगभरातील सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवर तुफान व्हायरल झाला असून, या साहसानंतर न्यू यॉर्क पोलिसांनी या जोडप्याला अटक केली आहे.

बॅनर झळकवला आणि हवेत केले प्रपोज

इव्हान बियरकस (Ivan Beerkus) आणि अँजेला निकोलाऊ (Angela Nikolau) असे या रशियन जोडप्याचे नाव आहे. १ जुलै रोजी दुपारी १२ च्या सुमारास काळ्या कपड्यात आणि तोंडावर मास्क लावलेल्या या दोघांनी एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केला. ते केवळ इमारतीच्या गच्चीवर थांबले नाहीत, तर थेट वर असलेल्या उंच अँटेनाच्या लोखंडी शिडीवरून सर्वात टोकावर जाऊन पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी एक मोठा काळा बॅनर फडकावला, ज्यावर "When the power of love beats the love of power, the world knows peace." असा मजकूर होता.

हा बॅनर दाखवल्यानंतर दोघे थोडे खाली आले. तिथे इव्हानने गुडघ्यावर बसून अँजेलाला लग्नासाठी प्रपोज केले. अँजेलाने होकार दिल्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि उंचावरून न्यू यॉर्क शहराच्या पार्श्वभूमीवर अंगठी दाखवत सेल्फी देखील काढले. हा प्रकार सुरू असताना न्यू यॉर्क पोलिसांचे ड्रोन आणि हेलिकॉप्टर त्यांच्यावर नजर ठेवून होते, तर खाली रस्त्यावरून जाणारे नागरिक हा थरार पाहून थक्क झाले होते. बरेचजण आपल्या कॅमेरात हा प्रकार कैद करत होते.

'स्कायवॉकर्स' म्हणून आहेत प्रसिद्ध, नेटफ्लिक्सवरही झळकेलेले

हे जोडपे सामान्य नागरिक नसून जगप्रसिद्ध 'रूफटॉपर्स' (इमारतींवर बेकायदेशिर चढाई करणे) आहेत. २०२४ मध्ये आलेल्या 'Skywalkers: A Love Story' या प्रसिद्ध नेटफ्लिक्स (Netflix) डॉक्युमेंट्रीचे ते मुख्य चेहरे आहेत. याआधी त्यांनी मलेशियातील मर्डेका ११८ आणि चीनमधील गगनचुंबी इमारतींवरही अशाच प्रकारे चढाई केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT