आंतरराष्ट्रीय

Psycho Killer : बालपणी ‘बोर्डिंग’मध्ये पाठवल्याचा राग; ४० वर्षांनंतर मुलाचा आई-वडिलांवर खुनी हल्ला

अमृता चौगुले

लंडन; पुढारी ऑनलाईन : बालपणी शिक्षणासाठी घरापासून दूर बोर्डिंग स्कूलमध्ये घातल्याचा राग मनात ठेऊन एका व्यक्तीने (Psycho Killer) तब्बल ४० वर्षांनी आपल्या आई – वडिलांवर जीवघेणा हल्ला करत बदला घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना ब्रिटनमधील नेदरॲडरली या छोट्याशा गावात घडली आहे. हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचे नाव एड लिन्से असून तो ५१ वर्षांचे आहे. त्यांच्यावर वडिलांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

ब्रिटनमध्ये एका व्यक्तीने आपल्या आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला केला. पोलिसांनी आरोपीची ओळख 51 वर्षीय एड लिन्से अशी केली आहे. असे सांगितले जात आहे की वयाच्या 11 व्या वर्षी एडला त्याच्या पालकांनी बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले होते. याचा त्यांना खूप दिवसांपासून राग होता. बदला घेण्याच्या उद्देशाने त्याने 40 वर्षांनंतर आपल्या वृद्ध आई-वडिलांवर हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, एड (Psycho Killer) हा एक अपयशी व्यावसायिक आहे.

स्थानिक वृत्तपत्रांच्या माहिती नुसार, एड लिन्से (Psycho Killer) हा २२ एप्रिलच्या मध्यरात्री नेदरॲडरली भागातील आई – वडिलांच्या फार्महाऊसमध्ये जबरदस्ती घुसला. त्यानंतर त्याने त्याच्या 85 वर्षीय वडील निकोलस क्लेटन आणि 82 वर्षीय आई ज्युलिया यांच्यावर हल्ला केला.

बार्डिंग स्कूलमध्ये झाला छळ (Psycho Killer)

याहू न्यूजनुसार, लिन्सीने वडिलांवर त्यांच्या बेडरूममध्ये हल्ला केला, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला, कानाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. जखमी वडिलांना अंतर्गत खूप रक्तस्त्राव झाला होता. त्यांना 5 आठवड्याहून अधिक काळ रुग्णालयात उपचार घेत होते. आरोपींनी स्वत:च्या आईच्या डोक्यावरही वार केला. या हल्ल्यात वृद्धमहिलेच्या पाठीवर गंभीर जखमा झालेल्या आढळल्या. दोन मुलांचा बाप असलेल्या आरोपी लिन्सीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, 1980 मध्ये पालकांनी त्याला ऑल-बॉईज पब्लिक स्कूलमध्ये पाठवले होते. येथे त्याचा खूप छळ करण्यात आला. याचा त्याच्या मनात राग होता आणि त्याला आपल्या आई-वडिलांचा बदला घ्यायचा होता.

एडच्या पालकांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीने घरी बोर्डिंग स्कूलमध्ये काय घडले याचा कधीही उल्लेख केला नाही. आईचे म्हणणे आहे की एडच्या मनात तिच्याबद्दल खूप दिवसांपासून कटुता होती. असे असतानाही त्याने आरोपींशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. वर्षानुवर्षे त्याला आर्थिक मदतही केली होती. पालक म्हणतात की एडला वाटत होते की त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये झालेल्या त्रासाची पालकांनी भरपाई करावी. याप्रकरणी न्यायालयाने आरोपी एडला पालकांवर खुनी हल्ला केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT