Mahrang Baloch Life Imprisonment pudhari
आंतरराष्ट्रीय

Mahrang Baloch Life Imprisonment: बलुचिस्तान पुन्हा पेटणार..? महरंग बलोच यांना जन्मठेप; ग्रेटा थनबर्ग थेट मुनीरनाच भिडली

Anirudha Sankpal

Mahrang Baloch Life Imprisonment: पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील मानवाधिकार कार्यकर्त्या महरंग बलोच यांना पाकिस्तानच्या एका दहशतवादविरोधी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही शिक्षा सुनावताच याचे आंतरराष्ट्रीय पडसाद पडायला सुरूवात झाली आहे. स्वीडिश पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने एक व्हिडिओ शेअर करत पाकिस्तानचे फिल्ड मार्शल मुनीर यांच्यावर टीका केली. ग्रेटाने आपल्या व्हिडिओत महरंग बलोचला त्वरित सोडून देण्यात यावे अशी मागणी केली. शांततापूर्ण असहमती दर्शवणे हा कोणता गुन्हा आहे असा सवाल देखील तिनं विचारला.

ग्रेटाच्या म्हणण्यानुसार, 'पाकिस्तानच्या एका दहशतवादी विरोधी न्यायालयाने महरंग बलोच आणि काही इतर कार्यकर्त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. महरंगला मार्च २०२५ मध्ये क्वेटा इथं झालेल्या एका शांतीपूर्ण आंदोलनवेळी अटक करण्यात आले होते. त्यांनी जबरदस्तीने गायब केल्या गेलेल्या लोकांविषयी आंदोलन केलं होतं. त्यांनी ज्युडिशियर किलिंगच्या विरूद्ध हे आंदोलन छेडले होते.

या व्हिडिओत ग्रेटा थनबर्ग यांनी महरंग या अनेक वर्षापासून बेपत्ता झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांसाठी आवाज उठवत होती. बलुचीस्तानमध्ये त्या न्यायाच्या मागणीसाठी शांततापूर्ण आंदोलन करत होत्या. त्यांना पाकिस्तानी सरकारने एक वर्षापेक्षा जास्त काळ अटकेत ठेवलं. त्यांच्यावर फुटीरतावादाचा देखील आरोप करण्यात आला आहे.

ग्रेटा थनबर्गने दावा केला की महरंग यांच्यावरचा खटला ही एका उच्च सुरक्षा असलेल्या जेलमध्ये बंद दरवाजाच्या आत चालवण्यात आला. त्यामुळं पारदर्शकपणा आणि न्याय प्रक्रियेवर ग्रेटा थनबर्ग यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांना मानवाधिकार वकील इमान मजारी यांचा देखील उल्लेख केला आहे. महरंग यांची कायदेशीर बाजू त्यांनी सांभाळली होती.

ग्रेटा थनबर्गचे म्हणणे आहे की, इमान मजारी हे देखील सरकारच्या धोरणांवर टीका करणे आणि नागरिक अधिकारांची वकिली केल्याबद्दल कारवाईला सामोरे जात आहेत. ग्रेटा म्हणते की, तुम्ही लोकांना जेलमध्ये टाकू शकता मात्र सत्य कधी कैद होत नाही. कोणत्याही आंदोलनाचा आवाज बंद केल्यानं ते आंदोलन संपुष्टात येत नाही.

ग्रेटा थनबर्ग सोबतच अनेक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कार्यकर्त्यांनी महरंग बलोच यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याबद्दल टीका केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार फाऊंडेशन (IHRF) यांनी देखील महरंग बलोच आणि सिबगतुल्ला शाह यांना जन्मठेपेची शिक्षा केल्याबद्दल कडक शब्दात टीका केली आहे.

दरम्यन, महरंग बलोच यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याचे तीव्र पडसाद हे बलुचीस्तानमध्ये पडण्याची शक्यता आहे. आधीच बलोच लिबरेशन आर्मी पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ले चढवत असताना आता शांततेच्या मार्गाने बलोच लोकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या महरंग बलोच यांना जन्मठेप सुनावल्यानंतर लोकांमध्ये जास्तच रोष निर्माण होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT