डर्बन : पुढारी ऑनलाईन ; महात्मा गांधी यांच्या पणती आशिष लता रामगोबिन यांना ७ वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही शिक्षा दक्षिण अफ्रिकेतील डर्बन कोर्टाने सुनावली आहे. रामगोबिन यांच्यावर ६० लाख रँड (रँड दक्षिण आफ्रिकेतील चलन) च्या फसवणुकी प्रकरणी ही शिक्षा सुनावली आहे. आशिष लता रामगोबिन ह्या ५६ वर्षांच्या आहेत. अफ्रिकेच्या डर्बन कोर्टाने सोमवारी (दि.०७) फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या प्रकरणात ही शिक्षा करण्यात आली.
अधिक वाचा : तर पालकमंत्र्यांनी गुन्हा दाखल करावा : शौमिका महाडिक
आशिष लता रामगोबिन यांनी उद्योगपती एस. आर. महाराज यांना फसवल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्त्या इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोबिन यांची ही कन्या आहे. इला गांधी या महात्मा गांधींचे पुत्र मणिलाल गांधी यांच्या कन्या आहेत. आशिष लता रामगोबिन यांच्यावर भारतीय रुपयांमध्ये जवळपास तीन कोटींची शिक्षा झाली आहे.
अधिक वाचा : 'जेव्हा ठाकरे-मोदी भेटतात, तेव्हा चर्चा तर होणारच'
आशिष लता यांनी 'न्यू आफ्रिका फुटवेअर डिस्ट्रिब्युटर्स'चे संचालक एस. आर. महाराज यांच्याशी ऑगस्ट २०१५ मध्ये चर्चा केली होती. महाराज यांची कंपनी कपडे, लिनेन आणि चप्पल-बुटांची आयात, निर्मिती आणि विक्रीचे काम करते. महाराज यांची कंपनी लाभांशाच्या आधारावर इतर कंपन्यांना वित्तीय मदतही देते. आशिष लता यांनी महाराजांना सांगितले होते की, त्यांनी साऊथ आफ्रिकन हॉस्पिटल ग्रुप नेट केअरसाठी लिनेनचे तीन कंटेनर मागवले आहेत.
अधिक वाचा :'तैरती लाशें सिस्टम को नंगा कर गई'
आशिष लता यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि नेट केअरची कागदपत्रे पाहता, महाराज यांनी कर्जासाठी त्यांच्यासोबत लिखित करार केला होता. मात्र, जेव्हा त्यांना बनावट कागदपत्रांबाबत कळलं, तेव्हा त्यांनी आशिष लता यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.
आशिष लता यांची आई इला गांधी यांना मानवाधिकारांसंबंधी कामामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळाली. भारतासोबत दक्षिण आफ्रिकेतही त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले. इला गांधी या महात्मा गांधींच्या चार मुलांपैकी एक असलेल्या मणिलाला गांधी यांची कन्या आहे.