Tukaram Mundhe | न्यूयॉर्क टाइम्समध्ये झळकले तुकाराम मुंढे  
आंतरराष्ट्रीय

Tukaram Mundhe | न्यूयॉर्क टाइम्समध्ये झळकले तुकाराम मुंढे

‘रॉक स्टार’ असे संबोधत घेतली दखल

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क; वृत्तसंस्था : महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांची अमेरिकेतील द न्यूयॉर्क टाइम्सने पहिल्या पानावर विशेष दखल घेतली आहे. “इन इंडिया, अ फूड इन्स्पेक्टर इज अ रॉकस्टार” या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्तात, “डिनर्स रिव्हेर हीम अँड ओनर्स फियर हीम” म्हणजे “ग्राहक त्यांना मानतात, तर खाद्यव्यावसायिक त्यांच्या कारवाईला घाबरतात,” असा उल्लेख करण्यात आला आहे.

मुंढे यांनी आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यपदार्थांची दुकाने, गोदामे तसेच क्विक-कॉमर्सच्या ‘डार्क स्टोअर्स’वर अचानक तपासण्या सुरू केल्या. स्वच्छता नियमांचे उल्लंघन आढळल्यास परवाने निलंबित करणे आणि आस्थापने तात्पुरती बंद करण्याची कारवाई करण्यात आली.

मुंबईतील काही प्रसिद्ध खाद्य आस्थापनांसह काही प्रसिद्ध चेन रेस्टॉरंटस्‌वरही कारवाई झाली. तपासण्यांमध्ये झुरळे, कालबाह्य खाद्यपदार्थ आणि स्वच्छतेशी संबंधित त्रुटी आढळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ब्लिंकइट आणि झेप्टोच्या काही डार्क स्टोअर्सवरही एफडीएने छापे टाकले. कडक कारवाईमुळे रेस्टॉरंट व्यावसायिकांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा असतानाच, अन्नाच्या गुणवत्तेबाबत जागरूक असलेल्या ग्राहकांमध्येही मुंढे यांना सर्व स्तरांतून पाठिंबाही मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT