फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी एका महिलेला जाहीरपणे घेतलेले चुंबन सध्या देशात चर्चेचा विषय बनले आहे.  X (Twitter)
आंतरराष्ट्रीय

फ्रान्‍स राष्‍ट्राध्‍यक्षांचे 'भान' हरपलं.. थेट क्रीडा मंत्र्यांच्‍या मिठीत विसावले!

ऑलिम्‍पिक उद्घाटन समारंभातील फोटो व्‍हायरल

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : फ्रेंच आणि चुंबन (किस) याचे नातं तसं जुनं आहे. फ्रेंच लोक अभिवादन म्हणून दोन्ही गालांवर चुंबन घेण्यासाठी ओळखले जातात. हे सांगायचे कारण म्‍हणजे सध्‍या जगभरात सध्‍या पॅरीस ऑलिम्‍पिकची चर्चा आहे. त्‍याचबरोबर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी एका महिलेला जाहीरपणे घेतलेले चुंबन सध्या देशात चर्चेचा विषय बनले आहे. या प्रसंगाचा फोटो व्‍हायरल झाल्‍याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

ऑलिम्‍पिक उद्घाटन समारंभात नेमकं काय घडलं ?

ऑलिम्‍पिक उद्घाटन समारंभात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन महिलेचे चुंबन घेत असतानाचा फोटो साेशल मीडियावर व्‍हायरल होत आहे. या फोटोमधील महिला या फ्रान्‍सच्‍या क्रीडा मंत्री आहेत. त्‍याचबरोबर माजी टेनिसपटू देखील आहे. फोटोमध्ये स्‍पष्‍ट दिसतं आहे की, महिला आणि मॅक्रॉन यांनी एकमेकांना मिठी मारली आहे. ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात फ्रान्सचे क्रीडा मंत्री अमेली औडे-कॅस्टेरा राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या गळ्याजवळ चुंबन घेत असल्याचा हा फोटो तुफान व्‍हायरल झाला असून, यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

अशोभनीय...! सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर

हा फोटो व्हायरल झाल्यापासून, सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे. एका युर्जरने X वर पोस्टवर म्‍हटलं की, "मला हा फोटो अशोभनीय वाटतो, तो राष्ट्रपती आणि मंत्री यांच्यासाठी हे योग्‍य नाही. केले. तर एकाने म्‍हटलं आहे की, मॅक्रॉन यांच्‍या पत्‍नीला हे आवडणार नाही".

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT