कॅलिफोर्नियाच्या जंगलामध्ये लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न करताना अग्निशमन दलाचे अधिकारी. (Image source- X)
आंतरराष्ट्रीय

Los Angeles wildfire | लॉस एंजलिसमध्ये अग्नीतांडव! २४ जण मृत्युमुखी, १६ बेपत्ता

लॉस एंजेलिसमधील आग आणखी भडक्याची शक्यता

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधील (Los Angeles wildfire) जंगलातील लागलेली आग अजूनही धुमसत आहे. या आगीत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच 16 जण बेपत्ता असल्याचीही माहिती 'द असोशियटेड प्रेस' या वृत्तसंस्थेने दिली आहे. यासह या भागामधील असणारी 12000 घरे बेचिराख झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लॉस एंजेलिसच्या जंगलात आग लागली आहे, जी अजूनही पसरत आहे. येत्या काही दिवसांत वारे तीव्र होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आग अधिक तीव्र होऊ शकते. पुढील काही दिवसात या परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागणार आहे.

California WildFire | मंगळवारी आग वाढण्याची शक्यता

अमेरिकेच्या पश्चिम किनारी लॉस एंजेलिस प्रदेशातील जंगलातील आगीत मृतांचा आकडा 24 वर पोहोचला आहे. यावेळी अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की किमान १६ लोक बेपत्ता आहेत, या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यासोबतच राष्ट्रीय हवामान सेवेने बुधवारपर्यंत तीव्र आगीच्या परिस्थितीचा इशारा दिला आहे. त्यांच्या मते, या भागात ताशी मंगळवारी 80 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि पर्वतीय भागात हा वेग 113 किलोमीटर प्रति तास असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवार अधिक धोकादायक असेल, असे हवामान सेवेचे हवामानशास्त्रज्ञ रिच थॉम्पसन यांनी सांगितले.

नागरिकांचे मृत्यदेह कुठे सापडले?

एंजेलिस सिटी मेडिकल एक्झामिनर ऑफिसने शनिवारी संध्याकाळी एका निवेदनात म्हटले आहे की, एकूण 16 लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी पाच जणांचा मृत्यू पॅलिसेड्समध्ये आणि 11 जणांचा मृत्यू ईटन परिसरात झाला आहे. यापूर्वी 11 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली होती, परंतु अधिकाऱ्यांनी मृतांचा आकडा वाढू शकतो असे म्हटले होते. अधिकाऱ्यांनी एक केंद्र स्थापन केले आहे जिथे लोक बेपत्ता व्यक्तींची तक्रार नोंदवू शकतात.

California WildFire| आग विझवण्यासाठी तीव्र प्रयत्न सुरु

कॅलिफोर्नियाच्या पश्चिम भागामध्ये पुन्हा जोरदार वारे वाहण्याची शक्यता लक्षात घेता अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न वाढवले ​​आहेत. अग्निशामक दल जेथे लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते पॉल गेटी संग्रहालय आणि कॅलिफोर्निया विद्यापीठापर्यंत विस्तारित नाही. मँडेव्हिल कॅन्यनमधील आग विझवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पॅसिफिक किनाऱ्याजवळील मँडेव्हिल कॅन्यन हे प्रसिद्ध अभिनेता अर्नोल्ड श्वार्झनेगरसह अनेक सेलिब्रिटींचे घर आहे.

लॉस एंजेलिसमध्ये पावसाचा अभाव

सध्या, अग्निशमन दलाच्या कार्यक्षेत्राजवळ हलके वारे वाहत आहेत, परंतु राष्ट्रीय हवामान सेवेने इशारा दिला आहे की सांता आना येथील जोरदार वारे जे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी समस्या निर्माण करू शकते. या वाऱ्यांमुळे आग वेगाने पसरत असल्याचे सांगितले जात आहे, ज्यामुळे लॉस एंजेलिस आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर जळून खाक झाला आहे. लॉस एंजेलिसमध्ये आठ महिन्यांहून अधिक काळ कोणताही पाऊस पडलेला नाही. त्यामुळे येथील वनराई वाळून खाक झाली आहे. या आगीमुळे आंतरराज्य महामार्ग 405 लाही धोका निर्माण झाला आहे, जो या भागातील मुख्य वाहतूक मार्ग आहे.

California WildFire| 12000 हून अधिक इमारती बेचिराख

लॉस एंजेलिस काउंटी शेरीफ रॉबर्ट लुना म्हणाले की, शनिवारीही स्निफर डॉग्स वापरून पथकांनी विनाश रोखण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. आगीने सुमारे 145 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापले आहे. आगीमुळे प्रभावित झालेले हजारो लोकांना अजूनही स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहराच्या उत्तरेकडील 40 किलोमीटर दाट लोकवस्ती असलेल्या भागात लागलेल्या आगीमुळे घरे, अपार्टमेंट इमारती, व्यावसायिक इमारती इत्यादीच्या 12000 हून अधिक इमारती नष्ट झाल्या आहेत. मात्र, आगीचे मुख्य कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुरुवातीच्या अंदाजानुसार, मालमत्तेच्या नुकसानीच्या बाबतीत ही सर्वात मोठी आग आहे. 'AccuWeather' च्या प्राथमिक अंदाजानुसार आतापर्यंत 135 अब्ज ते 150 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT