Longest Python ॲनाकाँडा या चित्रपटात ॲमेझॉनच्या जंगलातील महाकाय सापाची दहशत दाखवली होती या सापाला पाहून एवढे मोठे साप असतात हे जगाला कळले. चित्रपटात दाखवलेला साप हा सीजीआयची कमाल होती आणि चित्रपट काल्पानिक होता. तसचे पूर्वी टायटॉनोबोआही प्रचंड मोठ्या आकाराचा होता. चित्रपटातील माणूस गिळणार साप दाखवला होता पण आता असाच एक मोठा साप समोर आला आहे.
हा साप मात्र ॲनाकोंडा नसून अजगर जातीचा आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने या अजगाराला सर्वात मोठा साप म्हणून नोंदवले आहे. त्यांच्या सोशल अकाउंटवरुन या सापाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ४ फेब्रुवारी रोजी इंडोनेशिया येथे या सापाचा शोध लागल
23 फूट लांब व ९६ किलो इतका महाकाय आकार
इंडोनेशियाच्या सुलावेसीच्या जंगलात Ibu Baron नावाच्या रेटिक्युलेटेड पायथनचा शोध लागला असून, तिची लांबी 7.22 मीटर (23 फूट 8 इंच) मोजण्यात आली. या सापाची अधिकृतपणे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये जगातील सर्वात लांब वाइल्ड अजगर म्हणून नोंद करण्यसात आली आहे. या प्रचंड सापाचे वजन साधारण 96.5 किलो असून, त्याच्या नैसर्गिक अधिवासात हा शोध लावल्यामुळे वैज्ञानिक आणि जीवशास्त्रज्ञांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
इंडोनेशियाच्या सुलावेसी (Sulawesi) बेटाच्या मारोस (Maros) परिसरात सापाच्या असताना या अजगराचा शोध लागला. हा एक प्रचंड रेटिक्युलेटेड पायथन (Reticulated Python) या प्रजातीचा अजगर आहे हा जगात आतापर्यंत नोंद झालेल्या सापांपैकी सर्वात लांब साप ठरला आहे.
एका अस्वलाएवढे वजन
या अजगराचे वजन प्रौढ पांढऱ्या अस्वलाएवढे म्हटले तरी वावगे ठरणार नाही कारण जवळपास ९६ किलो इतके वजन भरले. या सापाची लांबी मोजताना संशाधेकाची चांगलीच दमछाक झालेली या व्हिडीओत दिसून येते आहे. अजगारांच्या प्रजातीमध्ये सर्वसारण रेटिक्युलेटेड पायथन सर्वात लांब असता तो इंडोनेशिया व आसपासच्या देंशामध्ये आढळतो. याची लांबी 4 ते 7 मिटरपर्यंत असते पण नुकत्याच सापडलेल्या अजगराने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. त्याची लांबी 7.3 मिटर इतकी ठरली आहे.
सर्वसाधारणपणे इंडियन रॉक पायथन (भारतीय अजगर) याची लांबी 3–4 मीटर तर वजन 20–40 किलो असते. बर्मीज पायथन लांबी: 4–5 मीटर तर वजन: 40–70 किलो इतके भरते रेटिक्युलेटेड पायथन (सगळ्यात लांब वाढणारी जात) याची लांबी 4 ते 7 तर 50–90 किलो इतके असते
यापूर्वी Medusa नावाच्या पायथनने 7.67 मीटर (25 फूट 2 इंच) लांबी मिळवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सर्वात लांब पाळीत अजगर म्हणून नोंद केली होती. पण आता सापडलेला अजगर हा पूर्णता जंगली आहे. हा जंगलात सापडलेला सर्वात मोठा साप ठरला आहे.