lebanon 31 killed in 1 day after israeli strikes us says ceasefire deal between israel hezbollah close
इस्रायली हल्‍ल्‍यात लेबनॉनमध्ये ३१ जण ठार  File Photo
आंतरराष्ट्रीय

इस्रायली हल्‍ल्‍यात लेबनॉनमध्ये ३१ जण ठार

हिजबुल्लासोबतचा युद्धविराम करार लवकरच होणार का?

निलेश पोतदार

पुढारी ऑनलाईन :

गेल्‍या एक वर्षाहून अधिक काळापासून इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. या युद्धाची झळ लेबनॉनसह ईराणपर्यंत पोहोचली आहे. आता पुन्हा एकदा युद्धाची धार वाढताना दिसून येत आहे. इस्रायलच्या हल्‍ल्‍यात (सोमवारी) दक्षिण बेरूत उद्ध्वस्त झाले. अधिकाऱ्यांच्या म्‍हणण्यानुसार या हल्‍ल्‍यामध्ये ३१ लोक मारले गेले. या दरम्‍यान अमेरिकेने म्‍हटलंय की, इस्रायल आणि हिजबुल्‍लाहमध्ये लवकरच संघर्षविराम होउ शकतो. यावर चर्चा सुरू असून लवकरच यातून मार्ग निघेल.

या ठिकाणांवर केला हल्‍ला

इस्रायली सैन्याने काल (सोमवार) सांगितले होते की, त्‍यांनी लेबनॉनमध्ये हिजबुल्‍लाहशी संबंधित २५ ठिकाणांना लक्ष्य केले होते. ज्‍यामध्ये नबातियेह, बालबेक, बेका घाट, दक्षिणी बेरूत आणि शहराच्या बाहेरील भागांचा समावेश आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्‍या फोटोंमध्ये राजधानीच्या दक्षिण उपनगरांमध्ये धुराचे लोट दिसत आहेत.

आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर सुरू असलेल्‍या युद्ध विरामाच्या प्रयत्‍नांच्या दरम्‍यानही या आठवड्यात मोठ्या प्रमाणात झालेल्‍या छापेमारीनंतर हल्‍ले करण्यात आले. आरोग्‍य मंत्रालयाने सांगितले की, शनिवारी पहाटे मध्य बेरूतच्या दाट लोकवस्तीच्या बस्ता परिसरात झालेल्या प्राणघातक हल्ल्यात किमान 29 लोक ठार झाले.

इस्त्रायली सैन्याने सोमवारी सांगितले की, त्यांनी तिथल्या हिजबुल्ला कमांड सेंटरवर हल्ला केला होता, मात्र इराण-समर्थित गटाच्या एका अधिकाऱ्याने वरिष्ठ सदस्याला लक्ष्य केल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. इस्रायलने मुख्य दक्षिणेकडील शहरांच्या काही भागांसाठी इशारा दिल्यानंतर टायर आणि नाबतीह येथे इस्रायली हल्ले झाल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समध्ये देण्यात आली आहे. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की सोमवारी इस्रायली हल्ल्यात किमान 31 लोक मारले गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.