आंतरराष्ट्रीय

Sindhu River Rock Check Dam : पाकच्या नाकावर टिच्चून लडाखमध्ये ‘सिंधू’वर पहिला ‘रॉक चेक डॅम’ सज्ज

पुढारी वृत्तसेवा

लेह : लडाखमधील सीमावर्ती भागातील शेतकरी बांधवांची तीव्र पाणीटंचाई दूर करण्यासाठी आणि सिंधू नदीच्या पाण्यावर भारताचा अधिकार अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. लेह जिल्ह्यातील उपशी येथे सिंधू नदीच्या मुख्य प्रवाहावर देशातील पहिल्या ‘रॉक चेक डॅम’ची उभारणी पूर्ण करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक शेतीला मोठे जीवनदान मिळाले आहे.

सिमेंटविना उभारणी अन्‌ १० फूट जलपातळीत वाढ

हा बंधारा पूर्णपणे नैसर्गिक शिळा आणि अजस्त्र दगडांचा वापर करून पर्यावरणपूरक पद्धतीने बांधण्यात आला असून यात सिमेंटचा अजिबात वापर करण्यात आलेला नाही. या बंधाऱ्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी सुमारे १० फुटांनी वाढली आहे. यामुळे जवळजवळ ४ कोटी (४० दशलक्ष) लिटर पाण्याचा राखीव साठा तयार झाला आहे.

लडाखमध्ये आणखी ३६ बंधाऱ्यांचा प्रस्ताव

या यशस्वी प्रयोगानंतर लडाख प्रशासन सिंधू नदीवर अशाच स्वरूपाचे आणखी प्रकल्प राबवण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे ५६ कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाचा ३६ चेक डॅमचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यामध्ये लेह भागातील ७ ‘हिमालयन रॉक चेक डॅम’ आणि कारगिल भागातील २९ ‘आरसीसी चेक डॅम’चा समावेश असून यामुळे संपूर्ण लडाखची जलसुरक्षा अधिक बळकट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT