Kumpo Ghost Dance 
आंतरराष्ट्रीय

Kumpo Dance |आफ्रिकेतील देशांमध्ये ‘कांतारा’ सारखाच चालतो हा ‘भूताचा’ रहस्यमय नाच! व्हिडीओ पाहून तुम्हीही पडाल विचारात!

पारलौकीक शक्ती नाचते ? नाच पाहून लोकही पडतात संभ्रमात

Namdev Gharal

Kumpo आफ्रिकेतील मागास देशांमध्ये अनेक प्रथा परंपरा आजही पाहायला मिळतात. यामध्ये एक नृत्‍य असते ते म्हणजे 'कुम्फो' (Kumpo) हे नृत्‍य. सेनेगल आणि गॅम्बिया या देशांमधील एक अत्यंत रहस्यमय आणि लोकप्रिय नृत्य प्रकार आहे. गवताचा पेंढा अशा प्रकारे घिरक्या घेत असतो की आत्‍मा किंवा काही पारलौकीक शक्ती याच्या पाठीमागे आहे. आणि लोकांच्यासाठी हा पवित्र आत्‍मा असतो.

डिओला' (Diola) समाजाचा रहस्यमय नाच

हे नृत्य पाहून असे वाटते की जणू गवत किंवा पेंढा स्वतःहून हवेत नाचत आहे, त्यामुळे याला अनेकदा 'अदृश्य शक्तीचे नृत्य' किंवा 'भूत नृत्य' (Ghost Dance) असेही म्हटले जाते. हे नृत्य पश्चिम आफ्रिकेतील 'डिओला' (Diola) समाजाच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. या नाचामध्ये गवताचा पेंढा हलत असतो स्थानिकांच्या श्रद्धेनुसार, हा कोणताही माणूस नसून तो एक 'आत्मा' (Spirit) आहे. या नर्तकाचा चेहरा, हात किंवा पाय कधीही बाहेर दिसत नाहीत.

काय आहे प्रकार

खरे तर या नृत्यात एक व्यक्ती डोक्यापासून पायापर्यंत वाळलेल्या ताडाच्या पानांच्या किंवा पेंढ्याच्या ढिगाऱ्याखाली पूर्णपणे स्वतःला झाकून घेतो. बाहेरून पाहणाऱ्याला कोणताही माणूस दिसत नाही, फक्त फिरणारा गवताचा ढिगारा दिसतो. या नर्तकाला कुम्पो म्हणतात. कुम्पोच्या डोक्यावर एक लाकडी काठी असते. नाचताना हा नर्तक त्या काठीवर स्वतःला तोलून धरतो आणि अत्यंत वेगाने भवऱ्यासारखा गोलाकार फिरतो.

का केला जातो भूताचा नाच

कुम्पोला गावाचा एक 'संरक्षक' मानले जाते. तो समाजातील लोकांमधील वाद मिटवतो, सर्वांना एकत्र राहण्याचा संदेश देतो आणि गावचे वाईट शक्तींपासून रक्षण करतो असे मानले जाते. तसेच या समाजता कुम्पोला स्पर्श करणे किंवा त्याच्या गवताच्या आत डोकावून पाहणे हा मोठा गुन्हा आणि पाप मानले जाते. असे करणाऱ्याला शाप लागतो अशी तिथल्या लोकांची धारणा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT