पुढारी ऑनलाईन डेस्क: इंग्लंडमधील एका कार्यक्रमात किंग चार्ल्स आणि क्वीन कॅमिला यांचे स्वागत चक्क एका भारतीय गाण्यावर झाले. हे भारताय गाणे म्हणजे अभिषेक बच्चन, हृतिक रोशन अभिनीत 'धूम' या हिंदी चित्रपटातील टायटल साँग 'धूम मचाले...' हे होय.
श्री मुक्तजीवन स्वामी बापा पाईप बँडने सादर केलेला हा क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वापरकर्ते आश्चर्यचकित झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तसेच सोशल मीडिया युजर्समध्ये यावरून चर्चादेखील रंगली. (King Charles & Indian Band)
स्कॉटिश बॅगपाईप्स आणि बॉलिवूड संगीत यांचा सुंदर मिलाफ साधत, एका भारतीय बँडने किंग चार्ल्स तिसरे आणि क्वीन कॅमिला यांचे स्वागत ‘धूम मचाले’ या गाण्याच्या तालावर केले. हा प्रसंग वेस्टमिन्स्टर ॲबी येथे राष्ट्रकुल दिन सोहळ्यादरम्यान घडला. हा अनोखा क्षण श्री मुक्तजीवन स्वामिबापा पाईप बँडने आपल्या सादरीकरणातून टिपला आणि तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
1950 च्या दशकात स्थापन झालेल्या या बँडने अनेकदा राजघराण्यासमोर आपल्या कला सादर केल्या आहेत. यूके, भारत, अमेरिका आणि केनिया येथे शाखा असलेल्या या गटाने स्कॉटिश संगीत परंपरा आणि हिंदू संस्कृतीचा अनोखा मिलाफ साधला आहे.
हिंदू-स्कॉटिश पाईप बँडच्या इंस्टाग्राम पेजवर नुकतेच शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक देशी प्रेक्षकांना हे खरे आहे यावर विश्वास बसत नव्हता.
काही वापरकर्त्यांनी ‘धूम 2’ चित्रपटाचा संदर्भ घेत हृतिक रोशनच्या पात्राची आठवण काढली, ज्यात तो एका हिऱ्याच्या चोरीसाठी क्वीन एलिझाबेथचा वेष घेतो. "हा तर नक्कीच हृतिक रोशन कॅमिलाच्या रूपात आहे!" असे एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने मजेदार कमेंट केली.
तथापि, काहींना हा व्हिडिओ संपादित असल्याचा संशय होता. मात्र, बीबीसीच्या अधिकृत वृत्तांकनाने हे सिद्ध केले की, किंग चार्ल्स आणि क्वीन कॅमिला वेस्टमिन्स्टर ॲबीमध्ये पोहोचताच ही प्रत्यक्षात झालेली परफॉर्मन्स होती.