कॅनडास्‍थित गुरुद्वाराच्या भिंतींवर खलिस्‍तान समर्थनात घोषणा लिहण्यात आल्‍या होत्‍या.  (Image Source X)
आंतरराष्ट्रीय

कॅनडातील गुरद्वाराची खलिस्‍तानवाद्यांनी केली तोडफोड!

khalistan movement : गुरुद्वाराच्या भिंतींवर लिहल्‍या खलिस्‍तान समर्थनाच्या घोषणा

Namdev Gharal

पुढारी ऑनलाईन डेस्‍कः कॅनडामध्ये एका गुरद्वारची खलिस्‍तान समर्थंकानी तोडफोड केल्‍याची घटना समोर आली आहे. या गुरुद्वाराच्या भितींवर खलिस्‍तान समर्थनाच्या घोषणा लिहण्यात आल्‍या तसेच तोडफोडही करण्यात आली. यासाठी कॅनडामधील एका गटाला जबाबदार धरण्यात आले आहे. पोलिस त्‍याअनुषंगाने तपास करीत आहेत.

ही घटना व्हॅनकोर येथील रॉस स्‍ट्रिट येथे असलेल्‍या गुरुद्वारामध्ये घडली आहे. तेथिल स्‍थानिक मिडीयाच्या माहितीनुसार याबाबतची एक तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी तपास सुरु केल्‍यावर ही घटना समोर आली आहे. याची माहिती सार्जंट स्‍टीव एडिसन यांनी या घटनेला दूजोरा दिला आहे.

याबाबतीत अजूनही कोणी संशयिताला ताब्‍यात घेण्यात आले नसून या गुरुद्वाराचे संचलन करणाऱ्या खालसा दिवान सोसायटीने या ज्‍या कोणी हा प्रकार केल आहे. ते इथल्‍या शिख समुदायात फूट पाडण्याचा प्रयत्‍न करत असल्‍याचा आरोप केला आहे. एक उग्रवादी संघटना अशा पद्धतीच्या घटना घडवून आणत आहे. ‘ त्‍यांच्या हरकती या शिख धर्म व कॅनडामधील शिख समाजातील सहकार्याच्या भावना कमजोर करण्यासाठी आहेत’ असे निवेदन दिले आहे. तसेच कॅनास्‍थित सर्व शिख बांधवांना अलगतावादी संघटनांच्या आमिषाला बळी पडू नये असे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT