आंतरराष्ट्रीय

सौदीचा डबल गेम! भारताच्या नकाशातून  जम्मू-काश्मीर गायब

Pudhari News

रियाध : वृत्तसंस्था

सौदी अरेबियातील रियाधमध्ये होऊ घातलेल्या आगामी जी-20 देशांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाने 20 रियालची एक चलनी नोट बाजारात आणली आहे. सौदीने नोटेवरील भारताच्या नकाशातून काश्मीर गायब केला आहे. सौदी अरेबियाच्या या कृतीवर भारताने तीव्र आक्षेप नोंदविला आहे.

गिलगिट, बाल्टिस्तानसह पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानमध्येही दाखविलेला नाही. त्याबद्दल भारतात सौदीचे गुणगान सुरू असतानाच ही नोट उपलब्ध झाली आहे. सौदीचा डबल गेम आणि खरा चेहरा समोर आला आहे. दुसरीकडे, पाकव्याप्त काश्मीरमधील कार्यकर्ते अमजद अय्युब मिर्झा यांनी सौदीने वरीलप्रमाणे भाग पाकिस्तानच्या नकाशात दाखविलेले नसल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. दिल्लीतील सौदीच्या दूतावासाला तसेच रियाधमधील भारतीय दूतावासाकडून सौदी सरकारला आक्षेप कळविण्यात आला आहे. सौदीकडून मात्र अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. भारत हा जी-20 समूहाचा सदस्य आहे, पाकिस्तानकडे या समूहाचे सदस्यत्व नाही. जी-20 राष्ट्रांची बैठक दि. 21-22 नोव्हेंबर रोजी रियाधला होणार आहे.

SCROLL FOR NEXT