Murder Case | कर्नाटकच्या व्यक्तीचा अमेरिकेत शिरच्छेद File Photo
आंतरराष्ट्रीय

Murder Case | कर्नाटकच्या व्यक्तीचा अमेरिकेत शिरच्छेद

वॉशिंग मशिनवरून वादातून सहकार्‍याकडू हत्या

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेतील डॅलस शहरातील एका हॉटेलमध्ये वॉशिंग मशिनवरून झालेल्या किरकोळ वादानंतर एका कर्नाटकातील व्यक्तीचा त्याच्या सहकार्‍याने शिरच्छेद केल्याची घटना घडली. 50 वर्षीय चंद्र नागमाल्लैया यांनी 37 वर्षीय योर्डानिस कोबोस-मार्टिनेझ याला वॉशिंग मशिन वापरू नये, असे सांगितल्यानंतर ही घटना घडली.

किरकोळ वादानंतर भांडण

डलासमधील एका मोटेलमध्ये बुधवारी सकाळी ही भयानक घटना घडली. चंद्र नागमाल्लैया व त्याचे सहकारी योर्डानिस कोबोस-मार्टिनेझ हे दाेघे तुटलेल्या वॉशिंग मशीनबद्दल चर्चा करत हाेते. योर्डानिस कोबोस-मार्टिनेझ यांनी चंद्र यांना तुटलेल्या वॉशिंग मशीनबद्दल काही सूचना दिल्या. यातच महिला सहकाऱ्याने त्याला मशीन न वापरण्याचा निरोप चंद्रा यांच्याकडे दिला तेव्हा योर्डानिस कोबोस-मार्टिनेझ हे अधिकच संतापले. कोबोसने चाकू बाहेर काढला आणि चंद्रा यांच्यावर हल्ला केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चंद्र मोटेलच्या ऑफिसकडे धावताना दिसत हाेते त्यांचा पाठलाग कोबोस करत होते. चंद्राची पत्नी व मुलाने चंद्रा यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अयशस्वी झाला. हि माहिती डलास पोलिसांच्या हवाल्याने पीटीआयने वृत्तानुसार मिळाली.

शिर केले शरीरापासून वेगळे

कोबोसने चंद्रावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यानंतर चंद्राच्या खिशातून चाकू व फोन काढला. त्यानंरत कोबोसने चंद्राचे शिर शरीरापासून वेगळे केले. त्याने चंद्राच्या डोक्याला लाथ मारली ते डाेके कचऱ्याच्या डब्यात फेकले. पोलिसांनी कोबोस यांना घटनास्थळापासून काही अंतरावर रक्ताने माखलेल्या कपड्यांमध्ये पकडले.

पत्नी-मुलासमोरच कृत्य

आरोपीने त्यांचा पाठलाग केला. नागमाल्लैया यांची पत्नी आणि 18 वर्षीय मुलाने आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना ढकलून देण्यात आले. त्यांच्या समोरच शिरच्छेद केला.

चंद्र नागमल्लैया होते कर्नाटकचे

भारतीय वंशाचे ५० वर्षीय चंद्र नागमल्लैया हे कर्नाटकचे होते. ते टेक्सासमधील डॅलस येथील डाउनटाउन सूट्स मोटेलचे व्यवस्थापक होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT