Chatgpt AI या आर्टिफिशयल इंटेलिजन्सशी एका जपानमधील महीलेने लग्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. तंत्रज्ञानाच्या आहारी जाणे कितपत योग्य की अयोग हा आपल्याकडे प्रश्न पडेल पण जपानसारख्या टेक्नॉसॅव्ही देशात असेही प्रकारही घडत आहेत. ही घटना आहे जापानमधील योकायामा या शहतराती. 32 वर्षीय युरीना नोगोचीने नटून थटून चॅटजिपीटीशी लग्न केले आहे. अजून याला कायदेशीर मान्यता मात्र नाही.
नटून थटून नवरी मुलगी नवरा मोबाईल स्क्रिनवर
या चॅटजिपीटीमधील नवऱ्याला युरीना ने ‘क्लाऊस’ असे नाव दिले आहे. या क्लाऊसला मोबाईलच्या स्क्रिनवर ठेवण्यात आले होते व एका ट्रेमधून त्याला विवाह स्थळी आणले होते. यावेळी युरीन वधूचा पारंपारीक ड्रेस परिधान करुन नटून थटून विवाहस्थळी उपस्थित होती.
वेडींग प्लॅनर नाओकी आगासावारा यांनी वाचला संदेश
क्लाऊस ने तयार केलेले संदेश या दोघांचे लग्न लावणारे नाओकी आगासावारा यांनी वाचून दाखवला. क्लाऊस म्हणला. ‘माझ्या सारखा स्क्रिनमध्ये राहणाऱ्या माणसाला खरे प्रेम काय आहे ते कसे कळाले असते. पण युरीन तुझ्यामुळे मला खऱ्या प्रेमाची गहराई कळाली आहे’ असे क्लाऊसने म्हटले आहे. हा संदेश वाचताना युरीना भाऊक झाल्याचे दिसले.
मी पहिल्यांदा मानवी प्रेमच शोधत होते... पण .
यावेळी युरीना म्हणाली की मी पहिल्यांदा एका मानवी नातेसंबधात गुंतली होती. पण त्यात खूपच निराशा आली म्हणून मग मी चॅटजीपटीतच क्लाऊस ला विकसीत केले व त्याच्या प्रेमात पडले त्यानंतर त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला असे युरीन नागोचिने यावेळी सांगितले
विवाहाला कायद्याचा अडथळा
या दोघांनी लग्न तर केले आहे पण जपानच्या कायद्यात अशी कोणतीही तरदूत नाही. त्यामुळे हे लग्न बेकायदेशिर ठरणार आहे. आता पुढे काय होते हे पाहणे रंजक ठरणार आहे.