Japanese Restaurant  
आंतरराष्ट्रीय

Japanese Restaurant | जपानमधील रॅस्टॉरंटमध्ये ‘या’ प्राण्याचे मांस खाण्यासाठी लागल्या आहेत रांगा : सरकारचा एक निर्णय ठरला कारणीभूत!

जपानच्या ग्रामीण भागात सरकार करत आहे या मांसाचा उपयोग नवीन संसाधन म्हणून

Namdev Gharal

Japanese Restaurant : जपान देशात सध्या एका वेगळ्याच विषयाची चर्चा सुरु आहे. सध्या तेथे लोक रॅस्टॉरंटमध्ये गर्दी करु लागले आहेत. याठिकाणी एका विषेश प्राण्यांचे मांस मिळत आहे. आणि हे चवदार मांस खाण्यासाठी जापनिज लोक आवर्जून रेस्टाँरटमध्ये जात आहेत. हा प्राणी आहे भालू उर्फ अस्वल. हो अस्वलाचे मांस खाण्यासाठी लोक हॉटेल्स रेस्टॉरंटमध्ये जात आहेत. याला कारण ठरला आहे सरकारचा एक निर्णय तो म्हणजे अस्वलांच्या शिकारीचा

काय आहे अस्वलांची शिकार करण्याचे कारण

जपानमध्ये अस्वलांची संख्या खूपच वाढली आहे. आणि माणंसावरील त्‍यांचे हल्ले वाढत आहेत. अस्वलांची संख्या वाढली आहे व खाण्याच्या शोधार्थ ते सध्या मानवी वस्तीकडे वळत आहेत. अनेक भालू सुपरमार्केट, शांळामध्ये हल्ले करु लागले होते. या अस्वलांच्या हल्ल्या मध्ये यावर्षी 13 लोकांना जीव गमवावा लागला आहे. त्‍यामुळे सरकाने यास अस्वलांना मारण्याचे आदेश दिलेत. हवामान बदलामुळे जंगलातील अस्वलांचे मुख्य अन्न असलेल्या 'ओक' आणि 'बीज' (Beech nuts) या फळांच्या उत्पादनात घट झाली आहे. परिणामी अन्नाच्या शोधात ही अस्वले डोंगरावरून शहरांकडे वळत आहेत.

कोणतीही गोष्ट वाया जावू न देण्याची जापनीज वृत्ती
हे भालू फेकुन दिले असते तर ते खराबच झाले असते. पण याचा वापर करण्यासाठी जापनीज लोकंची एक वृत्ती उपयोगी ठरली. त्‍यानी ती वाया न जावू देता त्‍यांच्या वेगवेगळया डिशेस तयार केल्या. अनेक रॅस्टॉरंट मालकांचे मत आहे की या किंमती मांसाची बरबादी होण्यापेक्षा त्‍याला सन्मानाने लोकांच्या पोटात जाऊ द्यावे. त्‍यामुळे अनेक रेस्टॉरंटमध्ये सध्या भालूच्या मांसाच्या वेगवेगळ्या डिशेस मिळत आहेत.

मारलेल्या अस्वलांचे करायचे काय

अस्वलांना मारण्यसाठी सरकाने कायद्यात बदल केला यापूर्वी त्यांना संरक्षण दिले जात असे, पण आता सार्वजनिक सुरक्षेसाठी त्यांची शिकार करणे किंवा त्यांना मारणे सोपे झाले आहे. सरकार आता अस्वले तर मारत आहे पण त्‍यांच्या मांसाच करायचे काय तर ते रेस्टॉरंटमध्ये देण्यात आले. तेव्हापासून रेस्टॉरंटमधी शेफ या मांसापसून वेगवेगळ्या डिशेश तयार करत आहेत. आणि या डिशेसचा स्वाद घेण्यासाठी अनेक लोक गर्दी करु लागले आहेत.

तसेच परंपरेचा विचार केला तर याठिकाणी अस्वलाचे मांस खाणे निषिद्ध मानले जात नाही. जपानमधील उत्तर भागात राहणाऱ्या 'आयनू' (Ainu) जमातीमध्ये अस्वल शिकार करण्याची जुनी परंपरा आहे. ते अस्वलाला डोंगराचा देव मानतात. याचे मांस खाने हा त्‍याचा सन्मान समजला जातो.

ही एक संधी असू शकतेः सरकाचे मत

टाकाकी किमूरा या ग्राहकाने सांगितले की हे अस्वलाचे मांस अतिशय स्वादीष्ट आहे. पोर्क किंवा बिफ पेक्षा वेगळा स्वाद आहे. अधिक चांगले लागत आहे. जपान सरकाने आता ग्रामीण भागात ही एक संधी म्हणून पाहत आहे. अनेकांना यापासून रोजगार मिळू शकतो असेही सरकारचे मत आहे. हे मांस एक संसाधन म्हूणून याचा वापर झाला पाहिजे यासाठी सरकारचे प्रयत्‍न सुरु आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळावी तसेच पर्यटकांना वेगळया चवीचे मांस मिळावे यासाठीही सरकारचे प्रयत्‍न सुरु आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT