टोकियो : जपानच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) मध्ये होणारी फूट टाळण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे जपानची सरकारी वृत्तवाहिनी एनएचकेने म्हटले आहे.
नुकत्याच झालेल्या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीतील पराभवानंतर त्यांच्यावर राजीनाम्यासाठी मोठा दबाव होता. जुलै 2025 मध्ये झालेल्या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीत इशिबा यांच्या नेतृत्वाखालील एलडीपी-कोमेइटो आघाडी सरकारला मोठा पराभव पत्करावा लागला होता. त्याची जबाबदारी स्वीकारत इशिबा यांनी अलीकडेच माफी मागितली होती आणि राजीनाम्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले होते.