Human Fridge जपानमधील कारखान्यातील या ‘मानवी फ्रिज’ची जगभर चर्चा! 
आंतरराष्ट्रीय

Human Fridge : उष्णतेत काम करुन थकलाय थेट फ्रिजमध्येज जाऊन बसा! जपानमधील कारखान्यातील या ‘मानवी फ्रिज’ची जगभर चर्चा!

भीषण उष्णतेवर जपानचा अनोखा तोडगा : कामगारांना थंडावा देण्यासाठी लाँच केले फोनबूथ आकाराचे 'कूलिंग बॉक्स‘

Namdev Gharal

Do Hiemon Box जपानमधील एका कारखान्यात कामगारांना वाढत्‍या उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून एक भन्नाट आयडिया राबविण्यात आली आहे. या ठिकाणी एक फ्रिज बसवला असून यामध्ये चक्क माणूस जाऊन आरामात बसू शकतो. अंत्‍यत गरमी होत असल्यास कारखान्यातील कामगार थोडावेळ यामध्ये जातो व बसतो. शरीराचे तापमान थंड झाल्यावर पुन्हा तो अधिक कार्यक्षमतेने काम सुरु करतो. आता या भन्नाड आयडियाची चर्चा जगभर सुरु असून. ज्या कंपनीने हे फ्रीज बनवले आहेत त्‍यांनी आतापर्यंत जपानमध्ये असे ३०० फ्रिज विकले आहेत. या फ्रिजचे नाव आहे Do Hiemon Box

याबाबत अधिक माहिती अशी की जपानमधील चिकू शहरातील एका टायर रिसायकलिंग कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांचा उष्णतेपासून बचाव व्हावा या हेतूने हे रेफ्रिजरेटर बसवले आहेत. या कारखान्यातील कामगारांना उष्ण वातावरणात थकवणारे काम करावे लागते आणि उन्हाळ्यात त्यांना हीट स्ट्रोकचा उच्च धोका असतो. यामुळेच त्‍यांनी ही मानवी फ्रिजची आयडीया सुरु केली आहे. आता या फ्रिजमुळे कामगारांना उष्णतेपासून दिलासा मिळत आहे. या फ्रिजचे तापमान सुमारे ९ डिग्री असते. यात शिरताच थंड हवेच्या झोतांमुळे अवघ्या काही मिनिटांत शरीराला बर्फासारखा थंडावा मिळतो.

हे मशीन वापरणारे ५१ वर्षीय कामगार ताबुची यांनी आपला अनुभव सांगताना म्हटले, "या मशीनमुळे मला उष्णतेतून त्वरित आराम मिळाला. एकदा आत गेल्यावर खूपच थंड आणि ताजेतवाने वाटते.

३०० हून अधिक युनिट्सची विक्री

टोकियोस्थित औद्योगिक उपकरण वितरक कंपनी 'ट्रूस्को नाकायामा' (Trusco Nakayama) ने एप्रिल महिन्यापासून या 'डू हिएमोन बॉक्स' (Do Hiemon Box) या नावाचे हे फ्रिज लाँच केले . याचे ३०० हून अधिक युनिट्स विकले आहेत. या एका मशीनची किंमत सुमारे १५ लाख येन आहे. सध्या बांधकाम साईट्स, कारखाने आणि गोदामांमध्ये या फ्रिज मशीनला मोठी मागणी असून, भविष्यात गोल्फ कोर्सेस आणि बेसबॉल स्टेडियम्समध्येही हे उपलब्ध केले जाणार आहे.

जपानमध्ये वाढती उष्णता

मानवनिर्मित हवामान बदलांमुळे जगभरात उष्णतेच्या लाटांची तीव्रता वाढत आहे. जपानमध्ये यंदा तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. नागरिकांनी या उष्णतेला नैसर्गिक आपत्तीप्रमाणे गांभीर्याने घ्यावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. टोकियोमध्ये ऑगस्टच्या मध्यापर्यंत उष्माघातामुळे जवळपास १२० जणांचा मृत्यू झाला आहे, तर देशभरात सुमारे ६३,००० नागरिकांना तातडीच्या उपचारांची गरज भासली. सरकारी कर्मचाऱ्यांना उन्हापासून दिलासा मिळावा म्हणून टोकियोमध्ये शॉर्ट्स घालून कार्यालयात येण्याची मुभा देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT