Dana Eden dead pudhari photo
आंतरराष्ट्रीय

Dana Eden dead: इस्रायलची स्पाय सिरीज 'तेहरान' च्या सह निर्मातीचा अथेन्समध्ये मृत्यू... 'इराण'च्या अँगलबाबत काय म्हणाले पोलीस?

Anirudha Sankpal

Dana Eden dead Athens hotel: इस्त्रायलची प्रसिद्ध टीव्ही सिरीज तेहरान च्या सह निर्मात्या अथेन्समधील हॉटेलमध्ये मृत अवस्थेत आढळून आल्या आहेत. तेहरान या सिरीजचा चौथ्या हंगामाचं शूटिंग सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी उशिरा एडन यांच्या भावाला ५२ वर्षाच्या डाना एडन हॉटेलमध्ये मृत अवस्थेत आढळून आल्या होत्या. याबाबतची माहिती ग्रीक पोलिसांनी दिली आहे. ग्रीक पोलिसांकडून एडन यांनी आपलं जीवन संपवल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, डोना आणि शुला प्रोडक्शनीनं ही कुटुंबासाठी, मित्र आणि सहकाऱ्यांसाठी खूप दुःखाचा क्षण आहे.' अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे. ही आतंरराष्ट्रीय प्रोडक्शन कंपनी असून एडन या कंपनीच्या संस्थापिका होत्या.

इस्त्रायल माध्यमांनी ग्रीक पोलीस हे या घटनेमागं इराणची संभाव्य लिंक तपासत आहेत असं वृत्त दिलं आहे. मात्र कंपनीनं वेगळी भूमिका घेत या घटनेमागं कोणतीही गुन्हेगारी किंवा राष्ट्रीय स्तरावरील अँगल असल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. त्यांनी ज्या अफवा पसरत आहेत त्यात काही तथ्य नाही असं सांगितलं.

अशा परिस्थितीत शवविच्छेदन करण्यात आलं आहे. यामध्ये जे ग्रीक पोलीस अधिकारी दावा करत आहेत त्याला पुष्टी मिळत आहे. एडन यांनी आपलं जीवन संपवल्याचं शवविच्छेदनाच्या अहवालावरून दिसून येत आहे.

पोलिसांनी देखील लगेचच तपास सुरू केला आहे. त्यांनी हॉटेल स्टाफ यांचे जबाब आणि सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज गोळा करण्याचं काम सुरू केलं होतं.

पोलीस दलाचे प्रवक्ते कन्स्टेटिनिया यांनी, या प्रकरणात काही काळं बेरं असल्यांचा संशय धुडकावून लावला आहे. निर्मातीच्या भावाने बोलताना त्या मानसिक स्वास्थ्यासाठी औषध उपचार घेत होत्या आणि त्यांना मागे रूग्णालयात देखील दाखल करण्यात आलं होतं असं सांगितलं.

एडन यांच्या या टीव्ही शोला एमी पुरस्कार देखील मिळाला आहे. अॅपल टीव्हीने तेहरान ही सिरीज प्रोड्युस केली होती. एडन या इस्त्रायली टीव्ही इंडस्ट्रीमधील एक आश्वासक व्यक्ती होती. त्या ४ फेब्रुवारीपासून अथेन्समध्ये वास्तव्यास होत्या. त्या स्पाय सीरजची पुढच्या हंगामाचे शूटिंग करण्यासाठी इथं आल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT