जेरूसलेम : इराणच्या हल्ल्यात मरण पावलेल्या सैनिकांच्या अंत्यसंस्कारावेळी सहकारी सैनिकांना शोक अनावर झाला. 
आंतरराष्ट्रीय

Israeli military stress | इस्रायली सैन्य मानसिक तणावाखाली : लष्करप्रमुख

पुढारी वृत्तसेवा

तेल अवीव; वृत्तसंस्था : इस्रायल सध्या अनेक आघाड्यांवर लढत असल्याने मनुष्यबळाचा प्रचंड तुटवडा असून इस्रायली सैन्य मानसिक तणावाखाली आहे. त्यामुळे नव्या भरतीची तातडीची निकड इस्रायलचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल एयाल जमीर यांनी व्यक्त केली.

इस्रायल आणि अमेरिकेने लादलेल्या युद्धाविरोधात इराणने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एकीकडे शस्त्रसंधी चर्चेचा प्रस्ताव अमेरिकेने इराणला दिला असताना दुसरीकडे आता थेट जमिनीवर लष्कर उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. अमेरिकेसोबत इस्रायलचंही सैन्य इराणविरोधातील जमिनीवरील लढाईत सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. इस्त्रायली लष्कराचे प्रमुख लेफ्टिनेंट जनरल एयाल जमीर यांनी सुरक्षा कॅबिनेटच्या बैठकीत अत्यंत गंभीर इशारा दिला आहे.‘इस्त्रायली सैन्य स्वतःच्याच दबावाखाली कोसळण्यापूर्वी मी धोक्याचे इशारे देत आहे,’ अशा शब्दांत त्यांनी सरकारला सावध केले आहे.

गाझा, लेबनॉन, सीरिया, वेस्ट बँक आणि थेट इराण अशा पाच वेगवेगळ्या आघाड्यांवर इस्त्रायली सैनिक सध्या तैनात आहेत. युद्ध परिस्थितीच नव्हे, तर शांततेच्या काळातही गाझा, लेबनॉन, सीरिया आणि वेस्ट बँकमध्ये इस्रायली सैन्याची आवश्यकता भासणार आहे. सततच्या कारवायांमुळे राखीव सैनिकांवर प्रचंड ताण आला असून, ते मानसिक आणि शारीरिकद़ृष्ट्या खचण्याची भीती व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT