पुढारी ऑनलाईन डेस्क : दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने आज (दि.२५) इस्रायलच्या दिशेने ३२० हून अधिक रॉकेट डागले. यानंतर अवघ्या काही तासांमध्ये इस्रायलच्या सैन्याने लेबनॉनमधील दहशतवादी तळांवर सुमारे १०० लढाऊ विमानांनी हल्ला केला. हिजबुल्लाहची हजारो रॉकेट लाँचर नष्ट केली आहेत. ( Israel Hezbollah Conflict)
हिजबुल्लाहने लेबनॉनमधून इस्रायलच्या भूभागावर आज सकाळी 320 हून अधिक रॉकेट डागले होते. लष्करी कमांडर फुआद शुक्र यांच्या हत्येला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचा दावा हिजबुल्लाहने केला. या हल्ल्याला सडेतोड प्रत्यूत्तर देण्यासाठी इस्रायलच्या सैन्याने लेबनॉनमधील दहशतवादी तळांवर सुमारे १०० लढाऊ विमानांनी हल्ला केला. दरम्यान, इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी पुढील ४८ तासांसाठी देशात आणीबाणी घोषित केली आहे. ( Israel Hezbollah Conflict)
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी त्यांनी “आम्ही आमच्या देशाचे रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, उत्तरेकडील रहिवाशांना त्यांच्या घरी सुरक्षितपणे परत आणण्यासाठी, कोणी आम्हाला नुकसान पोहोचवेल, त्याला आम्ही नुकसान पोहोचवू, असेही नेतन्याहू यांनी स्पष्ट केल्याचे वृत्त 'टाइम्स ऑफ इस्रायल'ने दिले आहे. ( Israel Hezbollah Conflict)
"आमच्या युद्धविमानांनी दहशतवादी संघटना हिजबुल्लाहची हजारो रॉकेट लाँचर बॅरल्सवर हल्ला करुन ती नष्ट केली," असे इस्रायली सैन्याने म्हटले आहे.
इस्त्रायलच्या सैन्याने म्हटलं आहे की. " हिजबुल्लाह इस्रायलीवर क्षेपणास्त्रे आणि रॉकेट सोडण्याची तयारी करत आहे. धमक्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहवर ४० क्षेपणास्त्रे डागली अहेत. ( Israel Hezbollah Conflict)
इस्रायल-हिजबुल्लाह यांच्यातील वाढत्या तणावाबाबत बोलताना व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते सीन सावेट म्हणाले की, इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील तणाव वाढत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन "इस्रायल आणि लेबनॉनमधील घडामोडींचे लक्ष आहे. वरिष्ठ अमेरिकन अधिकारी इस्रायली समकक्षांशी सतत संवाद साधत आहेत. आम्ही इस्रायलच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचे समर्थनाबरोबरच प्रादेशिक स्थिरतेसाठी काम करत राहू. ( Israel Hezbollah Conflict)