हमास नेते इस्माईल हनीयेह यांच्या हत्येची इस्रायलने कबुली दिली आहे. (file photo)
आंतरराष्ट्रीय

'हुती बंडखोरांचा शिरच्छेद करु!' इस्रायलचा थेट इशारा, हमास नेते हनीयेहच्या हत्येची दिली कबुली

Ismail Haniyeh Death | मध्य पूर्वेत तणाव आणखी वाढण्याचा धोका

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायलनेच (Israel) जुलैमध्ये हमास नेते इस्माईल हनीयेह (Ismail Haniyeh) यांची इराणमध्ये हत्या केल्याचे इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी सोमवारी पहिल्यांदाच जाहीर केले. यामुळे इराण आणि इस्रायल यांच्यातील गाझामधील युद्ध आणि संघर्षामुळे हादरलेल्या प्रदेशात तणाव आणखी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच लेबनॉनमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता आम्ही येमेनमधील हुती बंडखोरांनाही जोरदार झटका देऊ, असा इशारा इस्रायलने दिला आहे.

"अलीकडील काही दिवसांत हुती दहशतवादी संघटना इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागत आहेत, यासाठी मला माझ्या वक्तव्याच्या सुरुवातीला एक स्पष्ट संदेश द्यायचा आहे की आम्ही हमास, हिजबुल्लाहला पराभूत केले. आम्ही इराणच्या संरक्षण यंत्रणेला निष्क्रिय केले आहे. आम्ही त्यांच्या उत्पादन यंत्रणेचे नुकसान केले आहे. आम्ही सीरियातील असद राजवट उलथवून टाकली. आता आम्ही येमेनमधील हुती दहशतवादी संघटनेलाही जोरदार झटका देऊ, जे अखेरचे शिल्लक आहेत," असा इशारा कॅट्झ यांनी दिला आहे.

''इस्रायल त्यांच्या धोरणात्मक पायाभूत सुविधा नष्ट करेल. आम्ही त्यांच्या नेत्यांचा शिरच्छेद करू. जसा आम्ही तेहरान, गाझा आणि लेबनॉनमध्ये हनीयेह, सिनवर आणि नसराल्लाहचा केला. आम्ही येमनमधील होदेइदाह आणि सानामध्येही अशीच कारवाई करू," असे कॅटझ यांनी संरक्षण दलातील जवानांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमादरम्यान काट्झ यांनी ही माहिती दिली.

इराणची (Yemen) राजधानी तेहरानमध्ये जुलैमध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हमासच्या राजकीय ब्युरोचा प्रमुख इस्माइल हनीयेह (Ismail Haniyeh) ठार झाला होता. पण त्यावेळी इस्रायलने या हत्येच्या घटनेची पुष्टी केली नव्हती. आता चार महिन्यांनतर इस्रायलने त्याच्या हत्येची कबुली दिली आहे. या घटनेनंतर हमासने, 'भ्याड कृत्य केल्याशिवाय राहणार नाही' अशी ((Israel Hamas War) धमकी दिली होती. एप्रिलच्या सुरुवातीला, इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचे राजकीय नेते इस्माइल हनीयेह यांचे तीन मुलगे ठार झाले होते, अशी माहिती इस्रायलच्या संरक्षण दलाने (आयडीएफ) दिली होती.

इस्रायलची नाकाबंदी करण्याचा येमेनचा प्रयत्न

येमेनमधील इराण समर्थक गट इस्रायलची नाकाबंदी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी ते एका वर्षाहून अधिक काळ लाल समुद्रातील जहाजांवर हल्ला करत आहे. गाझामध्ये इस्रायलकडून वर्षभर होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टिनींच्याबद्दल एकजुटता दाखवत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT